mahamesh
mahamesh

"महामेष'चा 200 मेंढपाळांना फायदा 

सोलापूर : राज्यात मेंढपाळ व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने मागील वर्षी "राजे यशवंतराव होळकर महामेष योजना' सुरू केली होती. त्याला एक वर्षाचा कालावधी झाला आहे. एक वर्षाच्या कालावधीत स्थलांतरित घटकाच्या 200 लाभार्थ्यांना जवळपास साडेचार कोटी रुपयांचा लाभ दिला आहे. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील सर्वाधिक 70 मेंढपाळांचा समावेश आहे. 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्यावतीने "महामेष' ही योजना राबविली जात आहे. राज्यातील धनगर समाजातील जवळपास एक लाख मेंढपाळाकडून मेंढी पालनाचा व्यवसाय केला जातो. त्यांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासनाने दोन जून 2017 पासून "महामेष' योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 75 टक्के अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. 20 मेंढ्या व एक मेंढा नर असा मेंढीगट राज्यातील स्थायी व स्थलांतरित स्वरूपाच्या एक हजार मेंढपाळांना देण्याचे ठरले होते. यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्या अर्जाची जिल्हास्तरीय समितीने छाननी करून स्थायी व स्थलांतरित स्वरूपाच्या प्रत्येकी 500 याप्रमाणे एक हजार मेंढपाळांची निवड केली आहे.

त्यासाठी सुरवातीला चार कोटी 44 लाख रुपयांचा निधी महामंडळाकडे प्राप्त झाला होता. त्यापैकी जवळपास 70 टक्के निधी खर्च झाला आहे. 200 मेंढपाळांना अनुदान वाटप केले आहे. 92 मेंढपाळांना अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. उर्वरित 218 व स्थायी स्वरूपाच्या 500 मेंढपाळांसाठी महामंडळाला चार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, एवढ्या निधीत 718 मेंढपाळांना अनुदान देणे शक्‍य नसल्याने वाढीव 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी महामंडळाने शासनाकडे केली आहे. या योजनेत 75 टक्के हिस्सा राज्याचा तर 25 टक्के हिस्सा संबंधित लाभार्थ्यांचा आहे. स्थायी मेंढा गटाची किंमत तीन लाख 33 हजार तर स्थलांतरित मेंढा गटाची किंमत दोन लाख दोन हजार 500 रुपये एवढी आहे. 

मेंढ्याचे गट मंजूर झालेले काही जिल्हे 
पुणे-59, सातारा-51, नाशिक-69, नगर-70, धुळे-40, सोलापूर-36, बुलडाणा, कोल्हापूर-20, औरंगाबाद-17, बीड-13 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com