भोपळ्याच्या आंतरपिकामुळे झाला फायदा

राजकुमार शहा 
सोमवार, 9 जुलै 2018

मोहोळ - पापरी ता मोहोळ येथील प्रयोगशील शेतकरी बळीराम राऊ भोसले यांनी अडीच एकर क्षेत्रात दोन लाख रुपयाचे डांगर भोपळा (काशी भोपळा) याचे शेवग्यातुन अंतरपीक घेतले आहे. दुर्मिळ अशा या वेलवर्गीय पिक लावण्याचे शेतकरी सहजा सहजी धाडस करीत नाही. भोसले यांनी कलींगडासाठी तयार केलेल्या भोदावर मल्चींग पेपर टाकुन त्यावर भोपळा लागवड केली आहे. 

कलींगड नंतर झेंडु व त्यानंतर शेवगा लागवड केली आहे. डांगर भोपळा हे बारमाही येणारे पिक आहे. या भोपळ्याचा उपयोग उपवासासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. याच्या फोडी करुन विक्री केली जाते. पुणे मुंबई सारख्या शहरातील मोठमोठ्या हॉटेलमध्ये भाजीसाठी याचा उपयोग होतो. यासाठी मध्यम खडकाळ व पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. 

भोसले यांच्या एका भोपळ्याचे वजन सहा ते सात किलो आहे. प्रतिकीलो नऊ रुपये प्रमाण त्यांना विक्री दर मिळाला. विशेष म्हणजे हा भोपळा वेला पासुन दुर केल्यावर चार ते पाच महिने टिकतो. वाशी येथील बाजारपेठेत याला मोठी मागणी आहे सरासरी बावीस टन माल निघाल्याचे भोसले  यांनी सांगीतले. कुठल्याही फळ बागेत भोपळा हे अंतरपीक घेता येत असल्याचे भोसले यांनी सांगीतले.

Web Title: Benefit from the pumpkin's