बेटी बचाऒ-बेटी बढाऒचा राज्यभर विस्तार

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सोलापूर - राज्यातील 16 जिल्ह्यांत सुरु असलेली बेटी बचाऒ-बेटी बढाऒ या केंद्र पुरस्कृत योजनेचा आणखीन 19 जिल्ह्यांत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना आता संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे. 

मुलींचा जन्मदर कमी असलेल्या देशातील 100 जिल्ह्यांत 2015 पासून ही योजना राबविली जात आहे. ही योजना 2014-2017 या तीन वर्षांसाठी राबवायची होती.  पहिल्या टप्प्यात 10 आणि नंतरच्या टप्प्यांत सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. लिंग निवडीस प्रतिबंध करणे, बालिकेच्या जीवनमानाच्या सुरक्षेची खात्री देणे, बालिकेच्या शिक्षणाबाबत खात्री देणे हे या योजनेची उद्दीष्टे आहेत. 

केंद्र शासनाने या योजनेत आता महाराष्ट्रातील आणखीन 19 जिल्ह्यांचा समावेश केला आहे. त्यामध्ये सातारा, धुळे, नांदेड, अकोला, मुंबई उपनगर, मुंबई शहर, वर्धा, सिंधुदुर्ग, यवतमाळ, ठाणे, नागपूर, रायगड, अमरावती, रत्नागिरी, नंदूरबार, गडचिरोली, गोंदीया, भंडारा, चंद्रपूर यांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालघरचा या यादीत समावेश नाही.ही योजना जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राबविली जाणार आहे. त्यासाठी नियुक्त टास्कफोर्समध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी यांचा समावेश आहे.

असे राबविले जातील उपक्रम
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी गर्भवती मातांची नोंदणी
मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी जनजागृती
मुलींचे वाढदिवस साजरे करणे
मुला-मुलींची संख्या सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करणे
मुलींच्या जन्मदराबाबत पथनाट्यांचे आयोजन करणे

Web Title: Beti Bachao Beti Padhao Yojana statewide expansion