सोलापुरात "आयपीएल'वर सट्टा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

सोलापूर/सांगोला - आयपीएल मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोल्यात दोन ठिकाणी छापे घालून कारवाई केली. सांगोल्यात कडलास रोडवरील अलराईनगरातील अनिल चव्हाण याच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आणि एकतपूर रस्त्यावरील ड्रीमसिटी अपार्टमेंटमध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा खेळला जात होता. पोलिसांनी रोख रकमेसह टीव्ही, मोबाईल, मोटार असा 39 लाख आठ हजार साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Web Title: betting on IPL crime