"फेक लिंक' पासून सावधान ! पोलिसांचे आवाहन 

social media.jpg
social media.jpg

सांगली- "कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे घरात बसून असलेल्या लोकांचा इंटरनेटचा वापर वाढला आहे. अशातच "फेक लिंक' व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यापासून सावध रहा असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. 
लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे अनेकजण घरात बसूनच काम करत आहेत. त्यामुळे सर्वांचाच इंटरनेटचा वापर वाढला आहे. ही संधी साधून अनेकजण "फेक लिंक' व्हायरल करत आहेत. त्यापासून फसवणूक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक मनिषा डुबुले आणि सायबर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गजानन कांबळे यांनी नेटकऱ्यांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे. 
सध्या प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2020 मध्ये नोंदणी करून महिन्याला 3500 रूपये देण्याचे आमिष दाखवणारी "लिंक' अनेक ग्रुपवर फिरत आहे. या "लिंक' वर "क्‍लिक' केल्यानंतर प्रॉब्लेम असल्याचा संदेश मोबाईलवर दिसतो. त्याचबरोबर "फ्री नेटफ्लिक्‍स' साठीही लिंक सर्वत्र फिरत आहे. ती 20 लोकांना किंवा पाच ग्रुपवर पाठवण्यास टाकल्यास "फ्री नेटफ्लिक्‍स' असे आमिष दाखवले जाते. परंतू त्यामध्येही फसवणूक केली जात आहे. तसेच काही मोबाईल सर्व्हीस देणाऱ्या कंपनीकडून "फ्री रिचार्ज' मिळणार असल्याचे फसवे संदेशही फिरत आहेत. यासारख्या फसव्या "लिंक' ओपन करू नयेत. अनोळखी ऍप्स डाऊनलोड करू नयेत. असुरक्षित वेबपेज तसेच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर टाळावा. अशा संशयित "लिंक' बाबत www.reportphshing.in व www.cybercrime.gov.in वर तक्रार करावी असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com