भगवंत महोत्सव राज्यभर पोहोचावा - हभप जयवंत बोधले महाराज

सुदर्शन हांडे
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

बार्शी : भगवंत महोत्सव हा सोलापूर जिल्ह्या पुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात पोहोचावा. पहिल्याच वर्षी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नेटके नियोजन केल्याने हा महोत्सव यशस्वी झाला आहे.

महोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक विषयांचा समावेश करून सर्व धर्मीयांना सामावून घेत बार्शी पॅटर्न दखवला आहे. या मोहोत्सवच्या निमित्ताने बार्शीकरांची अनेक वर्षाची इच्छा पूर्ण झाली असे मत हभप जयवंत बोधले महाराज यांनी व्यक्त केले. 

बार्शी : भगवंत महोत्सव हा सोलापूर जिल्ह्या पुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात पोहोचावा. पहिल्याच वर्षी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नेटके नियोजन केल्याने हा महोत्सव यशस्वी झाला आहे.

महोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक विषयांचा समावेश करून सर्व धर्मीयांना सामावून घेत बार्शी पॅटर्न दखवला आहे. या मोहोत्सवच्या निमित्ताने बार्शीकरांची अनेक वर्षाची इच्छा पूर्ण झाली असे मत हभप जयवंत बोधले महाराज यांनी व्यक्त केले. 

या वेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी नगराध्यक्ष विश्वास बरबोले, ओम शांतीच्या संगीता बाहेनजी, जयेश कोठारी, संतोष ठोंबरे, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, शशिकांत जगदाळे, बंडुभाई शहा, अनिल बंडेवार, अशोक कुंकुलोळ, अनिल पवार, गौतम कांकरिया, डॉ विवेकानंद जानराव, संतोष गांधी, गौरीशंकर बेणे, पांडुरंग पाठक, प्रा. दिलीप मोहिते, पद्माकर कश्यपी आदी उपस्थित होते. 

ओमशांती च्या संगीता बहेन यांनी सर्वांचे संघटन उभे राहत सर्वाना सामावून घेणार भगवंत महोत्सव घडणे हे बार्शीकरांचे भाग्य आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी धाडसाचे पाऊल उचलून हा सात दिवसाचा महोत्सव सादर केला. पुढील काळात हा महोत्सव अजून मोठा होत राहावा असा संकल्प सर्व बार्शीकरांनी करण्याचे आवाहन केले. 

सुरुवातील दत्त स्तवन सादर केले.मी साताऱ्याची गुलछडी, मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा, गोंधळी गीत,रचना काळे हिने गावरान मैना राघूला सांगते हळू हळू पिंजऱ्याचे दार उघडा या लावणीवर मंत्रमुग्ध केले.राष्ट्रीय पुरस्कार प्राप्तम्होरक्या ची नायिका ऐश्वर्या कांबळे मी साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहू नका,ज्वानी च्या आगीची मशाल हाती, दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला , ढोलकीच्या तालावर घुंगाराच्या बोलावर मी नाचते ही दिलखेचक मिक्स लावणी सादर केली.भूषण देवकर याने सोचेगे तुमे प्यार करते रहे ये दिल बेकरार करते रहे हे गीत गायले. प्राची फटाले हिने ला ला ला ला ये मेरा दिल प्यार का दिवाना हे गीत आशा भोसले यांच्या स्टाईल ने गायले.कीर्ती नगरकर आली मदनाची तसुंद मला प्रीती च्या झुल्यात झुलवा,नादखुळा राया हा नादखुळा या लावण्या सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्या सह वाहवा मिळवली. 

सूत्रसंचालन अजित कुंकुलोळ यांनी तर आभार संतोष सुर्यवंशी यांनी मानले. 

बार्शी नगरपालिका व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंत मैदानावर सुरू असलेल्या भगवंत महोत्सवाचा सहावा दिवस स्थानिक कलावंतांनी गाजविला. सर्वच स्थानिक कलावंतांनी अप्रतिम कलेचे सादरीकरण करत घरच्या प्रेक्षकांची दाद मिळवली. 

म्होरक्याच्या टीमचा सत्कार.....
राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातलेल्या अमर देवकर दिग्दर्शित म्होरक्या मधील कलावंतांचा यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत व नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये अमर देवकर, सहनिर्माते अभय चव्हाण, चित्रपटातील मुख्य नायक रमण देवकर, नायिका ऐश्वर्या कांबळे यांच्यासह इतर अनेक कलाकार बार्शीतील आहेत. या सर्व टीमचा यावेळी सत्कार झाला.

यावेळी बँकॉक येथील स्पर्धेसाठी निवड झालेली सुवर्णपदक विजेती रचना काळे हिस प्रा. दिलीप रेवडकर व बालरोग तज्ञ डॉ युवराज रेवडकर यांनी रुपये दहा हजार रुपये बक्षीस दिले. 

यावेळी महोत्सव पाहण्यासाठी आलेल्या एका महिलेचे हरवलेले मंगळसूत्र राधिका पंडित या महिलेस सापडले होते. त्यांनी ते प्रामाणिकपणे सदर महिलेस परत केल्याबद्दल पंडित यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Bhagwant Mahotsav should reach all over in Maharashtra