भाई वैद्य यांचे जीवन प्रेरक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

सांगली - थोर समाजवादी नेते, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे जीवन राजकीय, सामाजिक क्षेत्रासाठी प्रेरक राहिले. नव्या पिढीत त्यांचे विचार पोहचवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा भावना आज येथे व्यक्त करण्यात आल्या. 

येथील कष्टकऱ्यांची दौलतमध्ये भाई वैद्य यांना श्रद्धांजलीसाठी सभा झाली. त्यात अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब मगदूम अध्यक्षस्थानी तर माजी आमदार प्रा. शरद पाटील प्रमुख उपस्थित होते. 

प्रा. पाटील म्हणाले, ""भाई वैद्य हे लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेले व्यक्तीमत्व होते. 1980 ला लोकनेते राजारामबापू पाटील यांनी दोन दिवसांचे शिबिर येथे घेतले. त्यावेळी त्यांनी व्यासपीठापेक्षा कार्यकर्त्यांत मिसळून आपले विचार, भूमिका रुजवले. निष्कलंक चारित्र्य, वैयक्तिक प्रामाणिकपणा या तत्त्वाने ते वागले. स्वातंत्र्य लढा, गोवा मुक्ती, संयुक्त महाराष्ट्र, आणीबाणी विरोध या लढ्यात ते सहभागी होते.'' 

श्री. मगदूम म्हणाले, ""भाई वैद्य यांच्यासोबत काम करायला मिळणे हे आनंददायी आणि प्रेरणादायी असायचे. त्यांचे विचार नव्या पिढीसमोर आणले पाहिजेत.'' 

विद्या स्वामी म्हणाल्या, ""भाई मला वडिलांसारखे होते. त्यांच्या सोशलिस्ट पक्षात मी काम करावे, अशी त्यांची इच्छा होती, मात्र मी नकार दिला. तरीही त्यांना मला नेहमी कष्टकऱ्यांसाठी काम करण्याची प्रेरणा दिली.'' 

शिवाजी दुर्गाचे म्हणाले, ""अशी माणसं निर्माण होणं कठीण आहे.'' 

सदाशिव मगदूम म्हणाले, ""त्यांच्यासोबत काम करताना वेगळीच प्रेरणा मिळायची.'' जर्नादन गोंधळे, प्रमोद जोग, शशिकांत गायकवाड आदींनी आठवणी सांगितल्या.

Web Title: bhai vaidya Tribute in sangli