भंडारदरा, रंधासह दहा गावची वाट बंद, आदिवासीही गावात घेईनात

शांताराम काळे
गुरुवार, 26 मार्च 2020

तालुक्यातील ग्रामीण भागात गावात आलेल्या नवीन लोकांच्या नोंदी ग्रामसेवक तलाठी अंगणवाडी , बालवाडी , आशा वर्कर नोंदी घेत आहेत. मात्र, ती यंत्रणाही तोकडी पडत आहे.

अकोले :"करोनाच्या प्रादुर्भाव नकोरे बुवा त्यापरी आपला गाव बरा" म्हणत मुंबई , पुणे , नाशिक व इतरत्र असलेले चाकरमानी व तरुण आपल्या गावी मिळेल त्या साधनाने परतत आहेत.सर्वात अधिक संख्या पुणे , चाकण येथील आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात गावात आलेल्या नवीन लोकांच्या नोंदी ग्रामसेवक तलाठी अंगणवाडी , बालवाडी , आशा वर्कर नोंदी घेत आहेत. मात्र, ती यंत्रणाही तोकडी पडत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन विभाग, तालुक्यातील संशयित रुग्णांची संख्या, मुंबई पुणे नाशिक, नगर येथून आलेल्या होम क्वारंटाइन रुग्णाची संख्या याबाब त काळजी घेणे आवश्यक आहे. पोलीस यंत्रणा शहरी भागात कार्यरत आहे.मात्र, आदिवासी भागातील गावागावातील तरुणांनी आपल्या गावाच्या सीमा बंद केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .  

तालुक्यातील टिटवी , पिंपरकणे , रंधा , कोदणी , बारी , वासळी ,पांजरे , शेंडी, भंडारदरा येथील गावातील सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी आपल्या गावच्या वेशीवर लाकडे, काटे, झाडे टाकून रास्ता  एकही बाहेर गावची गाडी गावात येऊ न देता त्यांना प्रतिबंध केला जात आहे. गावातील परंतु नोकरीसाठी बाहेरगावी असलेले गावी आल्यास त्यांची नावे आरोग्य  विभागाकडे  देऊन त्यांची तपासणी झाल्याशिवाय गावात त्यांना प्रवेश दिला जात नाही .

याकामी किरण बांबेरे ,सौरभ बांबेरे , अरुण करवंन्दे ,सुधीर पवार गोरक्षनाथ बाबेरे तर बारीच सरपंच तुकाराम खाडे , वसाळीचे सरपंच कोरडे गणेश पवार टिटवी चे सरपंच सौ कविता भांगरे यांनी चांगली मदत केली.

तालुक्यातून रोजगारासाठी स्थलांतर होते. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक याठिकाणी कामानिमित्ताने असलेली गावातीलच मुले आता आपली मौजमजा करण्यासाठी गावातील तरुणांना देखील मद्यपान करून रात्रभर धिंगाणा घालण्याचे काम करत आहे.

ग्रामपंचायतीने बाहेरून येणाऱ्या तरुणांची रजिस्टरला नोंद करून आरोग्याची तपासणी करून आजारी त्यांना गावाबाहेरील समाज मंदिरामध्ये चौदा दिवस ठेवण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandardara and ten villages along the road closed