धनगर समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा  

चंद्रकांत देवकते
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील  धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून जाणीवपुर्वक डावललेले एसटी समाजाचे आरक्षण जाहीर करावे , यासह अन्य मागण्यासाठी मोहोळ तालुका धनगर समाज व आरक्षण कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ तहसीलवर मंगळवार (ता .१४ ) भव्य मोर्चा काढण्यात  आला.            

मोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील  धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा व धनगर या शब्दाचा शब्दच्छंल करून जाणीवपुर्वक डावललेले एसटी समाजाचे आरक्षण जाहीर करावे , यासह अन्य मागण्यासाठी मोहोळ तालुका धनगर समाज व आरक्षण कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ तहसीलवर मंगळवार (ता .१४ ) भव्य मोर्चा काढण्यात  आला.            

शहरातील शिवाजी चौकातुन धनगरी गजेढोलच्या आवाजात  "आरक्षण नाही कुणाच्या  बापाचे, आरक्षण आमच्या हक्काचे " अशा घोषणा देत  भंडाऱ्याची उधळण करीत हा मोर्चा मेनरोडने तहसील कार्यालयात आला . यावेळी प्रामुख्याने पंचायत समितीच्या सभापती समता गावडे , नागनाथभाऊ क्षिरसागर,  धनाजी गावडे , संजय क्षिरसागर ,बाळासाहेब वाघमोडे , सोमेश क्षिरसागर, दिनेश घागरे , गणेश गावडे , यांनी धनगर समाजाच्या मागण्यासह आपल्या  भावना व्यक्त केल्या.

धनगर समाजाच्या  आरक्षणास पाठींबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर भाऊ डोंगरे, नगराध्यक्ष रमेश बारसकर, अॅड विनोद कांबळे, बंटी आवारे, बिलाल शेख, आदी मान्यवर मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यामोर्चामध्ये  मोहोळ  तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष भागवत शिंदे शामराव पाटील,  नागनाथ भाऊ क्षिरसागर, भिमराव जरग सर, दादासाहेब करणावर, संजय क्षिरसागर, दिनेश घागरे, सुनील पाटील, सोमेश क्षिरसागर,  मालती टेळे, बाळासाहेब वाघमोडे, धनाजी गावडे, धनाजी पुजारी, सिध्देश्वर आवारे, गणेश गावडे,  गणेश खताळ, बिरूदेव देवकते, रामचंद्र पाटील , तात्या पाटील, आण्णासाहेब पाटील, विठ्ठल कारंडे, परमेश्वर सरक, बाबासाहेब वाघमोडे, दिलीप टेकाळे, सुशील क्षिरसागर, भुंजग मळगे, रावसाहेब चोरमले, अनंता माने, मोहन होनमाने ,फंटु कोकरे, कुंडलिक गावडे, शाहीर सलगर, यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते. यावेळी तहसीलदार किशोर बिडवे यांनी धनगर समाजाचे निवेदन स्विकारून समाजाच्या भावना शासनास कळविणार असल्याचे आश्वासन दिले.

 

 

Web Title: Bhangar Morcha on the Tehsil office of Dhangar community