नगरपंचायतीवरून भाजप टार्गेटवर; सेनेचे बाबर राष्ट्रवादीच्या निशाण्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत पाटील आणि आनंदराव पाटील यांनी नगरपंचायतीवरून भाजप आणि शिवसेनेला लक्ष केले.
shivsena, BJp
shivsena, BJpesakal

आटपाडी (सांगली) : सेनेचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांनी आटपाडीच्या (Aatpati)सरपंच तर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख (Rajendra Anna Deshmukh)यांनी पुत्र प्रेमापोटी आटपाडी नगरपंचायतीला (Nagarpanchayat)खोडा घालून विकासाला खिळ घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत पाटील आणि आनंदराव पाटील यांनी नगरपंचायतीवरून भाजप आणि शिवसेनेला लक्ष केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत पाटील, आनंदराव पाटील यांनी सादिक खाटीक, गणेश जाधव आणि अशोक लवटे यांच्या उपस्थितीत आटपाडी नगरपंचायती दर्भात पत्रकार बैठक घेतली. बैठकीत दोन्ही आजी-माजी आमदारांनी शहराच्या विकासाला खीळ घातल्याचा स्पष्ट आरोप केला. 2013 पासून आटपाडी नगरपंचायतीची चार वेळा अधिसूचना निघाली. राज्य सरकारने सर्व तालुके नगरपंचायत किंवा नगरपरिषद करण्याचा निर्णय घेतला आहे.

shivsena, BJp
'FRP'चा दुसरा हप्ता न मिळाल्यास तीव्र आंदोलन; राजू शेट्टींचा इशारा

जिल्ह्यातील खानापूर, कवठेमंकाळ आणि जत मध्ये अंमलबजावणी केली पण चार वेळा अधिसूचना निघूनही आटपाडीची अंमलबजावणी झाली नाही. ती होऊ दिली नाही. याला आमदार अनिल बाबर आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख दोघेही जबाबदार आहेत. 2018 मध्ये अधिसूचना निघाली होती. यावेळी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आम्ही आवाहन केले पण भाजप सेनेने लोकांची फसवणूक करून निवडणूक लढवली. त्यानंतर सरपंच शिवसेनेचे तर उपसरपंच आणि सर्व सदस्य भाजपचे सत्तेत आले.

निवडणुकीनंतर आटपाडी नगरपंचायत होऊ नये यासाठी भाजप-सेनेने छुपे संगनमत केले आहे.आमदार अनिल बाबर यांनी नगरपंचायती संदर्भात भूमिका आणि तारखा जाहीर केल्या मात्र, त्यांचा सरपंच झाल्याने त्यांनी नगरपंचायत होऊन दिली नाही. तर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे पुत्र हर्षवर्धन देशमुख पंचायत समितीचे सभापती होण्यासाठी नगरपंचायतीला खोडा घातला. आटपाडी नगरपंचायत किंवा नगरपालिका होऊ नये असाच या दोन्ही नेत्यांचा आणि पक्षाचा अजेंडा आहे. आम्ही स्वर्गीय रामभाऊ पाटील यांच्या विचाराने काम करत आलो आहे. आमची बांधिलकी सत्तेपेक्षा जनतेशी आहे. ग्रामपंचायती पेक्षा नगरपंचायत किंवा नगरपरिषदेला जादा निधी मिळतो परिणामी शहराचा विकास होईल. त्यामुळे नगरपंचायतीला आमचे प्राधान्य असल्याचे पाटील यांनी सांगितले.

लढा सुरूच ठेवणार

आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपंचायत किंवा नगरपरिषदेत रूपांतर होण्यासाठी आम्ही विविध पातळीवर सतत प्रयत्न करत आहोत. त्यासाठी विविध प्रकारची आंदोलने करून सतत लढा दिला आहे तसेच तीन जानेवारीला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आटपाडीची नगरपालिका किंवा नगरपंचायत होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील असे सांगितले दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com