भारतीय जनता पक्षातून हे आहेत इच्छुक ; मुलाखती पुर्ण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा भाजपसाठी एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारीसाठी तयारी दर्शविली.

सातारा : भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या आज येथील शासकीय विश्रामगृहात मुलाखती घेतल्या. माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्ह्यातील तब्बल 58 इच्छुकांनी मुलाखती देत उमेदवारीची मागणी केली. जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा भाजपसाठी एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारीसाठी तयारी दर्शविली. 

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखतींची प्रक्रिया भाजपकडून राबविली जात आहे. आज सातारा जिल्ह्यातील सर्व आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया शासकीय विश्रामगृहात पार पडली. मुलाखतीसाठी पक्षाचे निरीक्षक म्हणून नागपूरचे आमदार अनिल सोले व पश्‍चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे हे साताऱ्यात आले. मुलाखती सुरू होण्यापूर्वी पक्षाच्या कोअर समितीची बैठक झाली. यामध्ये निरीक्षकांसह जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल- रुक्‍मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार, माजी आमदार मदन भोसले, शिवेंद्रसिंहराजे, डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, मनोज घोरपडे, महेश शिंदे, दत्ताजी थोरात, नगरसेवक विजय काटवटे आदी उपस्थित होते. त्यामध्ये सोले यांनी कोअर समिती सदस्यांकडून मतदारसंघनिहाय शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, गट, गण, प्रभाग या सर्वांची माहिती घेतली. बैठकीनंतर सोले, अनासपुरे व पावसकर यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 
 

हे आहेत इच्छुक 

सातारा मतदारसंघातून शिवेंद्रसिंहराजे, दीपक पवार, संतोष जाधव, वाईमधून मदन भोसले, कऱ्हाड दक्षिणमधून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व डॉ. अतुल भोसले, कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे, कोरेगावमधून महेश शिंदे, माणमधून डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, फलटणमधून संदीप शिंदे, पाटणमधून भरत पाटील अशा प्रमुख इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यांच्याबरोबर दिवसभर तब्बल 60 इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मतदारसंघ व इच्छुक उमेदवार पुढीलप्रमाणे ः कोरेगाव - महेश शिंदे, संतोष जाधव, विवेक कदम, रणजित फाळके, प्रभाकर साबळे, रमेश माने, सुवर्णा राजे, कऱ्हाड उत्तर - मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, सयाजीराव पाटील, विश्वासराव सावंत, हिंदुराव चव्हाण, रामचंद्र चव्हाण, सागर शिवदास, सातारा - शिवेंद्रसिंहराजे भोसले, दीपक पवार, अमित कदम, संतोष जाधव, अभय पवार, स्मिता निकम, सुनिशा शहा, वाई - मदन भोसले, चंद्रकांत काळे, मोनिका धायगुडे, अविनाश फरांदे, प्रशांत जगताप, रामदास शिंदे, दीपक जाधव, सचिन घाडगे, प्रदीप क्षीरसागर, शैलेंद्र वीर, दिनकर शिंदे, माण - डॉ. दिलीप येळगावकर, बाळासाहेब मासाळ, अनिल देसाई, सचिन गुदगे, महादेव कापसे, पाटण मतदारसंघातून भरत पाटील, कविता कचरे, सुरेखा तुपे, नानासो सावंत, रामचंद्र लाहोटी, दीपक महाडिक, सागर माने, नितीन जाधव, कऱ्हाड दक्षिण - विक्रम पावसकर, डॉ. अतुल भोसले, फलटण- स्वप्नाली शिंदे, रावसाहेब क्षीरसागर, मिलिंद काकडे, शैलेंद्र कांबळे, सुधीर अडागळे, राजेंद्र काकडे, नयना भगत, राज सोनावले, विश्वनाथ शिंदे, वसंत निकाळजे, संदीप शिंदे. 

आमदार गोरेंना विरोध 

माणमधील आमचं ठरलंय ग्रुपने आज मुलाखतींमध्येही एकी दाखविली. पक्षामध्ये आधीपासून काम करणाऱ्या पैकी कोणालाही तिकीट द्या; परंतु आमदार जयकुमार गोरे यांच्याबाबत ज्या चर्चा सुरू आहेत त्याला पूर्ण विराम द्या. त्यांच्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड चीड आहे. भाजपला चांगले वातावरण आहे. त्यामुळे आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी सर्व एक दिलाने काम करू, असे अनिल देसाई, डॉ. दिलीप येळगावकर, महादेव कापसे व अन्य इच्छुकांनी पक्ष निरीक्षकांना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharatiya Janata Parties Interviews completed