फळबाग लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर योजना 

Bhausaheb Phundkar scheme for cultivation of Horticulture
Bhausaheb Phundkar scheme for cultivation of Horticulture

सोलापूर - राज्यात 1990 पासून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड योजना राबविली होती. या माध्यमातून जवळपास 16 लाख हेक्‍टरवर फळबागेची लागवड झाली आहे. मात्र, 2005 पासून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची (एमआरईजीएस) अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर 'रोहयो'ची योजना शासनाने टप्या-टप्याने बंद केली. त्याच 'रोहयो'ची जागा यंदाच्या वर्षीपासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेने घेतली आहे. त्यासाठी यंदाच्या वर्षी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी नव्याने सुरु केलेल्या या फळबाग लागवड योजनेला (कै.) फुंडकर यांचे नाव दिले आहे. त्यामुळे ते सतत शेतकऱ्यांच्या आठवणीत राहतील. जे शेतकरी 'एमआरईजीएस'च्या निकषामध्ये बसत नाहीत, त्यांच्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. पहिल्या वर्षी 100, दुसऱ्या वर्षी 160 तर तिसऱ्या वर्षी 200 कोटी तर पुढील प्रत्येक वर्षी 200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 

या योजनेमध्ये फळबाग लागवड करताना कोकणात कमाल 10 हेक्‍टर व उर्वरित महाराष्ट्रात कमाल सहा हेक्‍टरपर्यंत लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तीन वर्षात टप्या-टप्याने हे अनुदान दिले जाईल. त्यामध्ये पहिल्या वर्षी 50, दुसऱ्या वर्षी 30 तर तिसऱ्या वर्षी 20 टक्के अनुदान मिळेल. लाभार्थ्यांनी फळबाग लावल्यानंतर पहिल्या वर्षी 80 तर दुसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जगविणे आवश्‍यक असेल. यानुसार फळझाडे जगविण्याचे प्रमाण न राखल्यास दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीचे अनुदान दिले जाणार नाही. या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे लक्षांक जिल्हा व तालुक्‍यांना न देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारच्या फळबागेची लागवड शेतकऱ्यांना करता येईल. 

यंदाच्या वर्षी ऑनलाइन नाही 
या योजनेमध्ये लागवडीसाठी मे ते नोव्हेंबर हा कालावधी निश्‍चित केला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. मात्र, पहिल्या वर्षी ही सुविधा उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांकडून प्रत्यक्षात अर्ज घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 

फळपिकनिहाय प्रति हेक्‍टर मिळणारे अनुदान 
आंबा-53,561, काजू-55,578, पेरु-2,02,090, डाळींब-1,09,487, संत्रा-मोसंबी-कागदी लिंबू-62,578, नारळ-59,622, सीताफळ-72,531, आवळा-49,735, चिंच-47,321, जांभूळ-47,321, कोकम-47,260, फणस-43,593, अंजिर-97,406, चिकू-52,061 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com