नगर : भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा भाजपमध्ये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज सायंकाळी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.

श्रीरामपूर (नगर) : मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज सायंकाळी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हळवणकर यांनी त्यांचे स्वागत केले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत वाकचौरे यांनी

श्रीरामपूर मतदासंघातून भाजपकडून उमेदवारी केली होती. त्यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी त्यांचा साडेचार हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. वाकचौरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून वाकचौरे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली. त्यात ते पराभूत झाले. बंडखोरीमुळे पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आज त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्यात आले.

आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी (ता. 7) "मातोश्री'वर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले होते. त्यानंतर आज सायंकाळी माजी खासदार वाकचौरे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष युती होते का, याकडे लागले आहे.

विधानसभेसाठी इच्छुक : वाकचौरे
भाजपमध्ये प्रवेश घेतल्यावर वाकचौरे म्हणाले, ""श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता, जनतेसाठी भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहोत. युतीबाबत स्पष्ट सांगता येत नाही; मात्र पक्षातील वरिष्ठांसोबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhausaheb Wakchaure again in BJP