आम्ही खायचं काय..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

कोल्हापूर - हातावरच आमचं पोट, दिसभर फळं, खाद्यपदार्थ विकून चार पैसे मिळालं की आमची चूल पेटती. उन्हाळी सुट्टी संपत आलीय साहेब. आमचा छोटा व्यवसाय आम्हाला सुरू करू द्या... अशी विनंती करत विक्रेते व्यवसायास परवानगी मिळेल या आशेने आज दुसऱ्या दिवशीही भवानी मंडपात बसून होते. 

भवानी मंडपात रविवारी भरधाव ट्रक घुसला; तसे महापालिका व पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. भवानी मंडप सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला. त्याचबरोबर येथील मोकळ्या जागेत बसून खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्यांनाही मज्जाव करण्यात आला. याचा फटका ८७ विक्रेत्यांना बसला. कालपासून त्यांची आंबे, जांभूळसह फळ व खाद्यपदार्थाची विक्री बंद झाली. ऐन उन्हाळी सुट्टीच्या हंगामाच्या सरतेशेवटी आर्थिक झळ सोसावी
लागल्याने विक्रेते हवालदिल झाले आहेत. कधी परवानगी मिळते याच्या प्रीतक्षेत ते आज सकाळपासून भवानी मंडपात ठाण मांडून बसून होते. याबाबत भाजपचे सुरेश जरग व कोल्हापूर जनशक्ती संघटनेचे समीर नदाफ यांनी पुढाकार घेऊन याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा घडवून आणली. यावर लवकरच मार्ग निघेल, अशी आशा व्यक्त होत आहे. 

परवानगीकडे डोळे 
जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत आमच्या जीवात जीव येणार नाही. आम्ही घरी बसून तरी काय करू, असे म्हणत विक्रेते परवानगी कधी मिळते याकडे डोळे लावून बसले होते.

Web Title: bhawani mandap issue