भिगवणमध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी

प्रा. प्रशांत चवरे
गुरुवार, 29 मार्च 2018

भिगवण - येथील सकल जैन समाज व ग्रामस्थांच्या वतीने भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महावीर जयंतीच्या निमित्ताने भगवान महावीर यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान विविध संघटनाच्या वतीने प्रतिमा पुजन करण्यात आले. जयंती निमित्ताने विविध धार्मिक कायर्क्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भगवान महावीर जयंती निमित्ताने येथील जैन मंदिरापासुन महावीरांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. येथील भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने भगवान महावीराच्या प्रतिमेचे पुजन सरपंच हेमा माडगे, उपसरपंच प्रदीप वाकसे, पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी  शंकरराव गायकवाड, अशोक पाचांगणे, प्रशांत शेलार, गणेश राक्षे, संतोष धवडे, वंदना शेलार, रेखाताई पाचांगणे, अशोक रायसोनी, रवींद्र रायसोनी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गावामधून मिरवणुक निघाल्यानंतर विविध संघटनाच्या वतीने भगवान महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करण्यात आला. अमर बौध्द चौकामध्ये संघटनेच्या वतीने दादासाहेब शेलार, संजय देहाडे, अमोल कांबळे, बाळासाहेब शेलार यांनी प्रतिमा पुजन केले. येथील भिगवण पतसंस्थेच्या वतीनेही भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. भिगवण पतसंस्थेचे अध्यक्ष महेंद्र बोगावत, उपाध्यक्ष रणजीत भोंगळे, अशोक शिंदे, डॉ. जयप्रकाश खरड यांचे हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.  

जयंती कार्यक्रमाचे नियोजन सकल जैन समाजाच्या वतीने अभयकुमार रायसोनी, विजयकुमार बोगावत, पकंज दोशी, सचिन गांधी, उमाकांत रायसोनी, सचिन बोगावत, डॉ. एल.जी. शहा, कमलेश गांधी, संतोष गांधी, गिरीष मुनोत, चेतन बोरा, स्वप्नील गांधी आदींनी केले. संपुर्ण गावांमधुन मिरवणुक काढल्यानंतर मिरवरणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी सचिन बोगावत व संजय रायसोनी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: bhigwan mahavir jayanti celebration