निकाली कुस्त्याच्या फडाने भिगवणच्या यात्रेची सांगता

प्रशांत चवरे
बुधवार, 11 एप्रिल 2018

भिगवण - येथील ग्रामदैवत श्री. भैरवनाथाच्या यात्रेची निकाली कुस्त्याच्या फडाने व महिलांसाठीच्या विशेष कार्यक्रमांने सांगता करण्यात आली. या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे यात्रेमध्ये वेगळा उत्साह दिसुन येत होता.

पुणे अहमदनगर व सोलापुर जिल्ह्यांच्या सिमारेषवर असलेल्या भिगवण गावाच्या यात्रेस विशेष महत्व आहे. यात्रेच्या निमित्ताने मंदिराभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रविवारी(ता.08) पहाटे महिलांच्या दंडवटाने यात्रेस सुरुवात झाली. त्यानंतर श्री. भैरवनाथ अभिषेक, पोषाख व महापुजा आदी धार्मिक कार्यक्रमानंतर मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. 

शेरणी वाटप, नवसाचे तोरण बाधणे आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. रात्री जुन्या गावातील मंदिरापासुन ते नवीन गावातील मंदिरापर्यत व त्यानंतर गावामधुन छबिना(सवाद्य मिरवणुक) काढण्यात आली. छबिना मंदिरामध्ये पोचल्यानंतर शोभेच्या दारुची नयनरम्य आतषबाजी करण्यात आली. रात्री मनोरंजनासाठी 'मदमस्त अप्सरा' हा कायर्क्रम ठेवण्यात आला होता.

सोमवारी(ता.09) सकाळी अकरा वाजता 'बारा गावच्या बारा अप्सरा' हा मनोरंजनाचा कायर्क्रम ठेवण्यात आला होता. दुपारी परिसरातील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी निकाली कुस्त्याच्या फडाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांबरोबर मुलींनीही कुस्तीमध्ये सहभाग घेतला. फडामध्ये साठ कुस्त्या निकाली करण्यात आल्या. कुत्स्यांचे मैदान पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मंगळवारी(ता.10) रात्री महिलांसाठी खास हा 'जल्लोश महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी वाहन निरिक्षक पदी निवड झालेल्या कोमल धुमाळ - रणमोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यात्रेचे नियोजन सरपंच हेमाताई माडगे, उपसरपंच प्रदीप वाकसे, यात्रा कमिटी व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले होते.

Web Title: bhigwan yatra ends with winnowing of the wrestling