पाचगणीत ‘कॉइन टाका-टॉयलेट वापरा’!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

भिलार - कॉइन टाका आणि टॉयलेट वापरा... आतापर्यंत आपण फक्त कॉइनचा वापर वेट मशिन, टेलिफोन कॉइन बॉक्‍स यासाठी केल्याचे पाहिले आहे. त्याही पुढे जाऊन आता ‘कॉइन’चा वापर आता ‘टॉयलेट’साठी होणार आहे. 

स्वच्छतेत देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या पाचगणी पालिकेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक अभिनव योजना राबवल्या आहेत. अशाच पद्धतीने शहरातील गर्दीच्या ठिकाणी ‘कॉइन टाका अन्‌ टॉयलेटला जा’ अशी अत्याधुनिक स्वयंचलित ई-टॉयलेट उभारून स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे.

शहरात पर्यटकांच्या गर्दीच्या ठिकाणी चार ई-टॉयलेट बसविण्यात आलेली आहेत. टॉयलेट नेमके कुठे आहे, याची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होत असल्याने पर्यटकांना तेथे तत्काळ पोचताही येणार आहे. शहरात पहिल्यांदाच ही संकल्पना राबवण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात इतर ठिकाणी अशी टॉयलेट बसवता येणार आहेत. ही अभिनव कल्पना असून, अत्याधुनिक जीपीएस प्रणालीचा त्यात वापर करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा कऱ्हाडकर यांनी या ई- टॉयलेटच्या उद्‌घाटनप्रसंगी दिली.

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत पाचगणी पालिकेने राज्यातच नव्हे तर देशात आपला स्वच्छतेचा डंका वाजविला आहे. जनजागृती करून नागरिकांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण केली आहे. स्वच्छतेचा घेतलेला हा वसा पाचगणीकरांनी पूर्ण करण्याचा चंग बांधला असून, ‘स्वच्छ पाचगणी व प्लॅस्टिकमूक्त पाचगणी’साठी नगराध्यक्षा, नगरसेवक, मुख्याधिकारी, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी उपनगराध्यक्ष रेखा कांबळे, नगरसेविका नीता कासुर्डे, रेखा जानकर, सुलभा लोखंडे, विनोद बिरामणे, नारायण बिरामणे, अनिल वन्ने, प्रवीण बोधे, दिलावर बागवान, उज्ज्वला महाडिक, हेमा गोळे, पृथ्वीराज कासुर्डे, विजय कांबळे, कार्यालयीन कर्मचारी नितीन मर्ढेकर, आबू डांगे, सुरेश मडके, गणेश कासुर्डे व नागरिक उपस्थित होते.

काय आहे ई-टॉयलेट...
यात अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा आहे. एका व्यक्तीला बसता येईल अशा भारतीय पद्धतीची यात व्यवस्था आहे. पाच रुपयांचे नाणे टाकल्यास दार उघडते. टॉयलेटच्या पाण्याच्या टाकीत पाणी नसेल तर दार उघडत नाही. व्यक्ती बाहेर पडल्यावर आपोआप पूर्ण टायलेट वॉश होते. यात वॉश बेसीन आहे. टॉयलेटमध्ये काही अडचण किंवा टॉयलेटमध्ये व्यक्ती असल्यास लाल दिवा दिसतो. काही अडचण नसल्यास ‘हिरवा दिवा’ लागतो.

Web Title: bhilar satara news e-toilet