भिलारचा स्ट्रॉबेरी महोत्सव रंगला 

दिलीपकुमार चिंचकर 
गुरुवार, 29 मार्च 2018

सातारा - महाबळेश्‍वर पाचगणी नजीक असलेल्या भिलार या पुस्तकांच्या गावाच्या शिवारातील लाल मातीत पिकलेली आपल्या अंबूस गोड चवीने सर्वांना भुरळ घालणाऱ्या स्ट्रॉबेरीचा महोत्सव चांगलाच रंगला आहे. नेहमीच्या पर्यटकांबरोबरच सलग सुट्यांमुळे लोंढ्यांनी आलेल्या पर्यटकांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे. स्ट्रॉबेरीचा फुकट आस्वाद घेतानाच येथे भरविण्यात आलेल्या आणि महाबळेश्‍वर पाचगणीत फुललेल्या रंगीबेरंगी फुलांच्या प्रदर्शनाला ही पर्यटक आवर्जुन भेट देत आहेत. मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत भिलारच्या थंड हवेत सारेजण रमून गेले आहेत. या महोत्सवाची महती आता देश-परेदशात ही पोहचल्याने यंदा गर्दी वाढली आहे.

सातारा - महाबळेश्‍वर पाचगणी नजीक असलेल्या भिलार या पुस्तकांच्या गावाच्या शिवारातील लाल मातीत पिकलेली आपल्या अंबूस गोड चवीने सर्वांना भुरळ घालणाऱ्या स्ट्रॉबेरीचा महोत्सव चांगलाच रंगला आहे. नेहमीच्या पर्यटकांबरोबरच सलग सुट्यांमुळे लोंढ्यांनी आलेल्या पर्यटकांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे. स्ट्रॉबेरीचा फुकट आस्वाद घेतानाच येथे भरविण्यात आलेल्या आणि महाबळेश्‍वर पाचगणीत फुललेल्या रंगीबेरंगी फुलांच्या प्रदर्शनाला ही पर्यटक आवर्जुन भेट देत आहेत. मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत भिलारच्या थंड हवेत सारेजण रमून गेले आहेत. या महोत्सवाची महती आता देश-परेदशात ही पोहचल्याने यंदा गर्दी वाढली आहे. या महोत्सव निमित्त आयोजकांनी भिलारमधील सर्व परिसर सुशोभित केला आहे. स्ट्रॉबेरीपासून विविध उत्पादने बाजारात आणलेल्या मॅप्रोने ही आपली छाप पाडली आहे. हा महोत्सव एक एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहे. 

Strawberry Festival

Strawberry Festival

Web Title: Bhilars Strawberry Festival in Satara