भीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार

भीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार

मोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम  2017-18  मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम यापूर्वीच दिली आहे. परंतु कारखाना प्रशासनाने प्रतिटन 2250 रुपये दर जाहीर केला होता. त्याप्रमाणे शेवटच्या दोन महिन्यात गाळप झालेल्या 2 लाख 70 हजार मेट्रिक टन ऊसाचे बील शेतकऱ्यांना 250 रुपये देणे राहिले होते. या 250 पैकी 100 रुपये  14 नोव्हेंबर पासून कै. भिमराव दादा महाडिक बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंसंस्थेमार्फत शेतकऱ्यांना रोखीने वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष सतिश जगताप यांनी दिली.

सिझन 2017-2018 च्या गळीत हंगामात 4 लाख 11 हजार 876  मेट्रिक टन उसाचे गाळप कारखान्याने केले होते. तर 10.10 टक्के इतका साखर उताऱ्याप्रमाणे 1980 रुपये भीमाची एफआरपी निघत असताना सभासदांच्या हितासाठी प्रतिटन 2250 रुपये कारखान्याचे अध्यक्ष खा. खासदार धनंजय महाडिक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार 15 फेब्रुवारीपर्यंत गाळपास आलेल्या सर्व ऊसाचे बील सभासदांना अदा करण्यात आले आहे . तर 16  ते 28  फेब्रुवारी व 1 ते 18  मार्च या  कालावधीत ऊस गाळप झालेल्या शेतकऱ्यांना 2000 रुपयाप्रमाणे या पूर्वीच पाहिली उचल वाटप केली  आहे. त्यांचे प्रतिटन 250 रुपयाप्रमाणे ऊस बिल रक्कम  कारखान्याकडे  थकीत  होती,  त्यापैकी 100 रुपयाप्रमाणे 2 कोटी 70 लाख रुपये येत्या बुधवार दि .14 पासून कै. भीमराव महाडिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतून वाटप होणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

उर्वरीत 150 रूपये  मकर सक्रांती सणानंतर देण्यात येणार असल्याचेही  त्यांनी सांगितले. सिझन 2018-19 च्या गाळप हंगामास जोरदार सुरुवात झाली आहे. तरी कार्यक्षेत्रातील सर्वच ऊसाचे गाळप भीमा कारखाना करणार आहे. सभासदानी इतर कारखान्यांच्या प्रलोभनांना बळी न पडता भीमा कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन जगताप यांनी यावेळी केले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील, सर्व संचालक मंडळ, शेतीअधिकारी एम. ए . पाटील, मुख्य लेखाधिकारी के. जी. काळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com