मोहोळमध्ये रमाई आवास घरकुलाचे भूमिपुजन 

चंद्रकांत देवकते
सोमवार, 9 जुलै 2018

मोहोळ (सोलापूर) - शहरासाठी मंजुर असलेल्या नगरपरिषद अंतर्गत रमाई आवास  घरकुल योजनेतील इंदुमती सोपान गवळी या लाभार्थीच्या घरकुलाचा पायाभरणी शुभारंभ सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कँग्रेसच्या निर्मला बावीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.  

शहरासाठी रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत २०१६ - १७ मध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक ५ कोटी रूपये निधी १९८ घरकुलासाठी मंजुर झाला आहे. याबाबत अधिक माहिती देताना राष्ट्रवादी कँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा यशोदा कांबळे यांनी सांगितले की, मंजुर असलेल्या घरकुलापैकी पाच घरकुलाचे धनादेश लाभार्थ्याना देण्यात आले आहेत. तर पन्नास घरकुलांच्या फाईली वर मुख्याधिकाऱ्यांची सही होणे राहीलेली आहे. ऊर्वरीत घरकुलाबाबत ज्या काही तांत्रीक अडचणी आहेत, ते सोडविण्यासाठी आम्ही  राष्ट्रवादी कँग्रेसच्या जिल्हा निरिक्षका निर्मला बावीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील आहोत. 

यावेळी युवा उद्योजक संतोष वायचळ, शांती कुमार  अष्टुळ, बाळासाहेब जाधव, राजन घाडगे, मोहोळ शहर  महीला राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अध्यक्षा यशोदा कांबळे, महीला  तालुकाध्यक्ष सिंधुताई वाघमारे, नगरसेवीका अर्चना वायचळ, कामीनी चोरमले, कल्पना खंदारे, संध्या लोखंडे, मंगला नाईकनवरे, स्मिता कोकणे, नंदा बनसोडे, बापू आठवले, आदीसह अनेक कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थीत होते.             

Web Title: Bhumi Pujan of Ramai Housing Ghorkula in Mohol