पोलिसी दडपशाहीला सणसणीत चपराक 

Bibliography in belgaum
Bibliography in belgaum

बेळगाव  : टाळ-मृदंगाचा गजर, ढोल-ताशांचा निनाद आणि मराठमोळ्या वातावरणात कुद्रेमानी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी निघाली. संमेलनाला परवानगी देण्यास प्रशासनाकडून झालेली टाळाटाळ व सकाळपासून गावात पोलिसांनी टाकलेल्या डेऱ्यामुळे दिंडीला उपस्थिती कमी राहील, अशी चर्चा होती. पण, कुद्रेमानीकरांनी पोलिसांच्या दडपशाहीला झुगारुन देत मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी होत प्रशासनाला सणसणीत चपराक लगावली. 

गावच्या वेशीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरापासून सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. अर्जुन जांबोटकर यांनी विठ्ठल रखुमाई पूजन करुन ग्रंथदिंडीला चालना दिली. पालखी पूजन शांताराम पाटील व ग्रंथदिंडीचे उद्‌घाटन डॉ. एल. एन. हुलजी यांनी केले. लक्ष्मण धामणेकर यांनी शिवपुतळा पूजन केले. दिंडीत अग्रभागी ढोल-ताशा पथक होते. सुरवातीला राकसकोपमधील शिवाज्ञा झांजपथक व शाळेच्या मराठमोळ्या वेषातील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. मराठी शाळेच्या कलश घेऊन चालणाऱ्या मुली सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. गावातील वारकरी टाळ-मृदंगाचा गरज करत होते. महिला व युवक मंडळे, साहित्य संघाचे कार्यकारी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी व मान्यवर पाहुणे दिंडीत सहभागी झाले होते. मराठमोळ्या वेशातील युवती दिंडीचे आकर्षण ठरल्या. 

दिंडी नीटनेटकेपणाने व शिस्तबद्ध रित्या चालली होती. संतांचा गजर करत दिंडी पुढे पुढे सरकत होती. दिंडीनिमित्त गावातील वातावरण भगवेमय झाले होते. दिंडी मार्गावर ठिकठिकाणी भगवे ध्वज लावले होते. लक्षवेधी रांगोळ्या काढल्या होत्या. ट्रॅक्‍टरवर राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रपुरुषांच्या वेशातील मुली सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सुवासिनी आरती ओवाळून साहित्यिकांचे स्वागत करीत होत्या. संमेलनाध्यक्ष प्रा. अशोक बागवे संमेलन, उद्‌घाटक सरस्वती पाटील, कवी विष्णू थोरे, प्रशांत केंदळे, उमेश सुतार, मानसी दिवेकर, एस. एल. चौगुले, सदानंद धामणेकर, व्याख्याते विजय भोसले, कथाकथनकार शांतिनाथ मांगले आदी सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com