अतीपावसामुळे सातारा जिल्ह्यातील द्राक्षबागांचे कोट्यवधींचे नुकसान

अंकश चव्हाण
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

द्राक्ष बागांवर होणाऱ्या खर्चाचा मेळ बसत नसल्याने द्राक्षबागायतदारांनी बागांवर कुऱ्हाड चालविण्यास सुरवात केली आहे. 

कलेढोण (जि. सातारा) : अतीपावसामुळे मायणी,कलेढोण,विखळे,म्हासुर्णे,कानकात्रेसह मायणी मंडलातील हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. त्यात कलेढोणच्या हेक्‍टरवरील द्राक्षबागांचा समावेश आहे. द्राक्षबागेत साठलेल्या पाण्यामुळे घड जिरणे, घडकूज, डाऊन्या, भूरीमुळे हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्षबागांच्या उत्पादनात सुमारे कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  

खटाव तालुक्‍यातील कलेढोणसह, मायणी,निमसोड, विखळे, पाचवड,मुळीकवाडी,तरसवाडी, गारुडी,कानकात्रे,हिवरवाडी, अनफळे,गारळेवाडी,गुंडेवाडी आदी भागातील द्राक्षे जिल्ह्याला परकिय चलन मिळवून देतात. यंदाच्या पावसामुळे मायणी मंडलात द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात घडकूज, घड जिरणे, डाऊन्या,भूरीचा प्रादुर्भाव झाल्याने युरोपच्या मालाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. ज्या निर्यातक्षम बागेतील झाडांवर ते घड असतात. त्या झाडांवर पाच ते सातच घड आले आहेत. पावसामुळे अनेक बागा छाटण्याविना उभा आहेत. तर काही द्राक्षबागायतदारांनी बागा काढण्यास सरुवात केली आहे. 

ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात विकतचे पाणी आणून बागांना दिले, त्याच बागेतून आता अतिपावसामुळे पाणी निघता निघेना. या पावसाने बाधीत झालेल्या झाडांना वाचविण्यासाठी मारलेल्या औषधांचा खर्च न परवडणारा नसल्याने कलेढोणच्या हसन कुमठेकर व धनंजय कारंडे यांनी बागांवर कुऱ्हाडी चालविल्या आहेत.तर अनेकांनी बागा छाटण्याचे काम हाती घेतले नाही.
 
द्राक्षबागेसाठी छाटणीपासून मालापर्यंत हेक्‍टरी सुमारे साडेसात ते आठ लाखांचा खर्च येतो. या मालास परदेशात ते रुपये तर लोकलसाठी ते रुपये प्रतीकिलो असा दर मिळतो. या द्राक्षबागांचे सरासरी रुपये दराने प्रतीहेक्‍टरी लाखांच्या उत्पादनाप्रमाणे हेक्‍टरचे सुमारे कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाजात दिसून येत आहे. नुकताच कृषी विभागाने मायणी, कलेढोण, विखळे ,पडळ आदीं ठिकाणच्या द्राक्षबागांचे पंचनामे करुन तालुका प्रशासनास अहवाल सादर केला आहे.
 
शासन निर्णयानुसार फळबागेसाठी एकरी अठरा हजारांची नुकसान भरपाई करण्याची तरदूत आहे. मात्र सद्यपरिस्थित या मदतीच्या रकमेत सुधारणा करुन त्यात वाढ करण्याची गरज आहे. 

द्राक्षबागेवरील संकटातून वाचण्यासाठी बॅंकाचे कर्ज काढूनही खर्चाचा मेळ बसणार नाही. माझी दोन एकर बाग असून त्यातील एक एकर बाग केवळ औषधांच्या खर्चाचा बोजा न परवडणारा असल्यामुळे काढून टाकली आहे. शासनाने नुकसान भरपाईसाठी मदत द्यावी. त्यामुळे शेतकरी संकटातून सावरु शकेल.
- हसन कुमठेकर , बेलवाडी (ता. खटाव)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Billions of damage to vineyards due to excess rainfall in satara district