लेझर शोद्वारे उलगडले श्री सिद्धेश्‍वरांचे जीवनचरित्र

Lazer Show
Lazer Show

सोलापूर : यंदा शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेत पारंपरिक दारूकामासह प्रथमच आकर्षक लेझर शो सादर करण्यात आला. लेझर शोद्वारे श्री सिद्धेश्‍वरांचे जीवनचरित्र चित्ररूपाने मांडण्यात आले. तसेच आसमंतातील काळोखात देशभक्तिगीतांच्या तालावर विलोभनीय रंगीबेरंगी छटांची थरारक दृश्‍ये पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

भाविक-प्रेक्षकांचा उत्साह
या वर्षी प्रथमच बंगळूरच्या श्री कृष्णा ड्रीम वर्क या कंपनीने सादर केलेल्या लेझर शोमुळे यात्रेच्या आकर्षणात आणखी भर पडली. मानाच्या सातही नंदीध्वजांचे वाद्यवृंदांसह मिरवणुकीने होम मैदानावर रात्री आठ वाजता आगमन झाले. रात्री साडेआठ वाजता पारदर्शक पडद्यावर रंगीबेरंगी झगमगाटाला सुरवात झाली, तसे प्रेक्षकांचा उत्साह वाढला व आनंदाने टाळ्यांचा गजरही झाला.

लेझर शो व दारूकामाची आतषबाजी
प्रारंभी लेझर शोमधून श्री सिद्धरामेश्‍वरांचे चित्ररूपी जीवनचरित्र दाखवण्यात आले. यानंतर "ॐ नम: शिवाय' या भक्तिगीताने आकाशात लेझर शोचे विलोभनीय दर्शन घडले. "जय हो', "वंदे मातरम' आदी भक्तिगीतांवरील लेझर शोदरम्यान कृत्रिम धूर सोडून किरणांमधून विविधरंगी विहंगम दृष्ये निर्माण करण्यात आली. सिद्धेश्‍वर फायर वर्क्‍सने दारूकामातून "काश्‍मीर हमारा है, पीओके भी हमारा है', "नारी का सन्मान देश का सन्मान' महादेवाचे त्रिशूल, धबधबा, कारंजे आदींचे नेत्रदीपक दर्शन घडवले.

हे मान्यवर होते उपस्थित
लेझर शो व दारूकामाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. दीपक तावरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य जिल्हा न्यायाधीश एस. आर. देशपांडे अध्यक्षस्थानी होते. या वेळी न्या. यू. एल. जोशी, न्या. वाय. जी. देशमुख, व्ही. जी. मोहिते, न्या. एस. एम. कणकदंडे, न्या. के. पी. जैन, न्या. एस. वही. देशपांडे, न्या. पी. व्ही. कापडिया, न्या. व्ही. बी. चव्हाण, न्या. आर. के. मिसाळ, न्या. एस. व्ही. पवार, न्या. एम. आर. देवकते, सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, यात्रा कमिटीचे अध्यक्ष भीमाशंकर पटणे, शोभेच्या दारूकाम समितीचे अध्यक्ष ऍड. विश्‍वनाथ आळंगे, संचालक ऍड. मिलिंद थोबडे, बाळासाहेब भोगडे, जनता बॅंकेचे संचालक महेश अंदेली, विश्‍वनाथ लब्बा, विश्‍वस्त डॉ. राजेंद्र घुली, बसवराज अष्टगी, शिवकुमार पाटील, डॉ. राजेंद्रप्रसाद येळीकर, नीलकंठप्पा कोनापुरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com