"बायोमेट्रिक प्रेझेंटी विथ ड्रेसकोड' महापालिका शिक्षकांचे स्मार्ट पाऊल 

solapur
solapur

सोलापूर - शिक्षकांना ड्रेसकोड असावा की नसावा, याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागात रोज गदारोळ सुरू असताना महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी मात्र "बायोमेट्रिक प्रेझेंटी विथ ड्रेसकोड'चा अंगीकार करत महापालिकेच्या शाळा केवळ शिक्षणातच नव्हे, तर काळाची गरज ओळखण्यात "स्मार्ट' असल्याचे दाखवून दिले आहे. 

महापालिकेतील कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता महापालिका शाळांतील शिक्षकांनाही स्मार्ट बायोमेट्रिक हजेरी लागू करण्यात आली आहे. 10 शाळांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने प्रेझेंटी सुरू झाली आहे. अनेक शिक्षक शाळांमध्ये कधी येतात, कधी जातात याची काहीच नोंद नसते. त्याला आता चाप बसला आहे. विशेष म्हणजे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वेळेआधी उपस्थित राहू लागले आहेत. ही हजेरी शिक्षकांसह शिपायांसाठीही असणार आहे. या यंत्रणेचा वापर कसा करायचा, याबाबत निवड केलेल्या 10 शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. 

महापालिकेच्या 59 शाळा आहेत. या सर्व शाळांत टप्प्याटप्प्याने ही यंत्रणा बसवली जाईल. स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना महापालिकेपाठोपाठ शिक्षकांनाही स्मार्ट करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने सुरू केले आहे. त्याच वेळी शिक्षणासाठी डिजिटल सुविधा देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. 

"ड्रेसकोड विथ बायोमेट्रिक प्रेझेंटी' संकल्पना अंगीकारून महापालिका शाळेतील शिक्षकांनी स्मार्टपणाचे लक्षण दाखवून दिले आहे. या यंत्रणेमुळे कर्तव्यात हलगर्जीपणा करणारे कोण, याचीही माहिती मिळणार आहे. 
- सुधा साळुंके, प्रशासनाधिकारी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com