पक्षाने मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला केला अन्...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

कुरुंदवाड ( कोल्हापूर ) - मधमाशांच्या हल्ल्यात कुरुंदवाड भैरवाडी येथील श्रीमती सोनाबाई राजाराम कोकाटे (वय 65)या महिलेचा मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या पाच जणांवरही माशांनी केलेल्या हल्लात जखमी झाल्या आहेत. 

कुरुंदवाड ( कोल्हापूर ) - मधमाशांच्या हल्ल्यात कुरुंदवाड भैरवाडी येथील श्रीमती सोनाबाई राजाराम कोकाटे (वय 65)या महिलेचा मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या पाच जणांवरही माशांनी केलेल्या हल्लात जखमी झाल्या आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, भैरवाडी येथील सोनाबाई कोकाटे जुन्या कुरुंदवाड शिरोळ मार्गावरील शेतात गेल्या होत्या. तेथील जॅकवेलशेजारी शेतात काम करत असताना अचानक जॅकवेलवर असणाऱ्या मधमाशांच्या पोळ्यावर पक्षाने हल्ला केल्यामुळे मधमाश्‍या उठल्या. सोनाबाई कोकाटे  या त्याच ठिकाणी शेजारच्या शेतात काम करत होत्या. त्यांच्यावर या मधमाशांनी हल्ला केला. शेकडो माश्‍या अंगावर आल्याने कोकाटे प्रतिकार करू शकल्या नाहीत. त्यांनी जोर जोरात आरडाओरडा सुरू केला. हे पाहून आजूबाजूच्या शेतातील लोकही तेथे धावले. त्यांनी कोकाटे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

धुर फवारणी, पाण्याचा माराही

माशांना पांगवण्यासाठी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा बंब पाचारण करून पाणी मारले. त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. अखेर फॉगिंग मशीनद्वारे धुर फवारणी करून या माशांना दूर घालवण्यात आले. तोपर्यंत या मधमाश्‍यांनी कोकाटे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेत असतानाही माशा त्यांच्यावर हल्ला करत होत्या.

हेही वाचा - आम्ही कोल्हापुरी ! मटण दरवाढीवर आमचा असाही तोडगा 

या हल्ल्यात अन्य पाचजण जखमी

दरम्यान सोनाबाई कोकाटे यांचा आरडाओरडा ऐकून त्यांना वाचवण्यासाठी गेलेले संजय पाटील, आनंद मोहिते, राजू पाटील, धनपाल चिंचवडे, सुनील पाटील हे जखमी झाले. सोनाबाई कोकाटे यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी भैरवाडी कुरुंदवाड परिसरात पसरली अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा मुलगी सून जावई नातवंडे असा परिवार आहे. 

हेही वाचा - पंचगंगा घाटावरचा बावीसशे वर्षांपूर्वीचा इतिहास 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird Attack On Honey Bee Nest And Honey Bee Attack On Woman