इचलकरंजीत आज वर्षातील तिसरी पक्षिगणना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

इचलकरंजी : येथे नव्वदहून अधिक प्रजातीच्या पक्षांचे अस्तित्व आढळले असून, या वर्षातील तिसरी पक्षिगणना रविवारी (ता. 16) होत आहे. सकाळी 7 ते 9 या वेळेत होणाऱ्या या गणनेत शहर आणि परिसरातील पक्षी प्रेमींनी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन इचलकरंजी पक्षिमित्र, सकाळ आणि संवाद सामाजिक मंडळ यांनी केले आहे. 

औद्योगिक शहर असले तरी इचलकरंजी शहर आणि परिसराचा अनेक भाग आजही सुजलाम्‌ सुफलाम्‌ आहे. पंचगंगा नदीच्या कुशीत असलेला हा भाग अनेक पक्षांसाठी सोयीस्कर आहे. त्यामुळेच या परिसरात अनेकवेळा परराज्यातून पक्षी येतात.

या पक्षांची गणना यापूर्वी गेल्या पावसाळ्यात व हिवाळ्यात केली होती. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे या महिन्यात सर्वत्र पक्षी गणना कार्यक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत इचलकरंजी पक्षी मित्र संघटना, सकाळ आणि संवाद सामाजिक मंडळ यांच्यातर्फे रविवारी पक्षी गणना करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सहा गट असून इच्छुकांनी रविवारी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत चित्कला कुलकर्णी, मनोरंजन मंडळ बिल्डिंग, दाते मळा, सुंदर बागेजवळ येथे जमावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

या ठिकाणी होईल पक्षी गणना 
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे गुगल मॅपद्वारे पक्षी निरीक्षणाचे ठिकाण निश्‍चित केली आहेत. ती सरासरी दोन किलोमीटर अंतरावर आहेत. पक्षिगणना पुढील भागामध्ये होईल. 1) नारायण मळा परिसर 2) जुना चंदूर रोड 3) पंचगंगा नदी घाट 4) आवाडे सबस्टेशन ते जॅकवेल रोड 5) सुंदर बाग 6) सांगली रोड

Web Title: Bird Counting activity in Ichalkaranji