पक्षी आश्रयस्थानाच्या कुंपणाचे काम सुरू

अंकुश चव्हाण
सोमवार, 24 डिसेंबर 2018

कलेढोण - राज्यात पक्षी आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायणी (ता. खटाव) येथील पक्षी आश्रयस्थानात चंदनतस्करी होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच वन विभागाने तारेच्या कुंपणाच्या कामास सुरवात केली आहे. त्यामुळे दोन दिवसांत कुंपणासाठी कोणता, कोठून निधी वन विभागाला आला, अगोदर मंजूर झाला असेल चर कामास दिरंगाई कशासाठी, असा सवाल सुजाण पर्यावरणप्रेमी उपस्थित करीत आहेत. 

जिल्ह्यासह राज्यात मायणीच्या पक्षी आश्रयस्थानाचे नाव अग्रेसर आहे. त्यात वन विभागाने विविध प्रकारची झाडे लावली आहे. त्यात आंबा, 
वड, चिंच, खैर, चंदन आदी प्रकारची वनसंपदा आहे. ती जोपासण्यासाठी शासनाने वनक्षेत्राला तारेचे कुंपण उभारलेले आहे. मात्र, या कुंपणाचे अनेक ठिकाणी पोल, तारा निघून पडल्याने वन विभागातून मोठी चोरटी वृक्षतोड होत असते. त्यात चंदनासारख्या मौल्यवान झाडांचा समावेश आहे.

‘सकाळ’ने याबाबत ‘मायणी आश्रयस्थानात चंदनतस्करी’ या मथळ्याखाली १९ डिसेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रसिध्द केले. त्यानंतर लगेच शुक्रवारपासून (ता. २१) मल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरच्या वन विभागाने लोखंडी खांब उभारून कुंपणाच्या कामास सुरवात केली आहे. ’सकाळ’च्या बातमीनंतर या कामाचा निधी दोन दिवसांत कसा बाहेर आला, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

कुंपणाचा निधी अगोदर उपलब्ध होता तर हे काम अगोदर का पूर्ण झाले 
नाही ? त्यासाठी वृत्तपत्रात बातम्या येणे आवश्‍यक होते काय ? वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी मायणीच्या वनखात्याकडे दुर्लक्ष आहे काय? असा प्रश्न मायणीतील पर्यावरणप्रेमी विचारीत आहेत. या निधीबाबत वनपाल काश्‍मीर शिंदे यांना विचारले असता मला याबाबत काही माहिती नाही. ते साहेबांना माहीत आहे. ते राहिलेलेच काम आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

एवढी घाई कशासाठी..?
सुमारे ७०० ते ८०० मीटर लांबीवर उभारण्यात येणारे लोखंडी पोल केवळ खडी-सिमेंटने बरबटले असून, ते आतापासून हलत आहेत. खडी- सिमेंटचे योग्य प्रमाण नसल्यामुळे कामाची एवढी घाई कशासाठी सुरू आहे, हा प्रश्न निसर्गप्रेमींना पडला आहे.

Web Title: Bird Residence Compound