उजनी धरणावर पक्ष्यांचे संमेलन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

केतूर (जि. सोलापूर) - वाढत्या उन्हामुळे उजनीची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त होत असली तरी या घटत्या पातळीचा फायदा देशी-विदेशी पक्ष्यांना होत असल्याचे चित्र उजनीच्या पाणलोट पट्ट्यात सध्या दिसत आहे. 

गेल्या वर्षी उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने (113 टक्के) भरल्याने या वर्षी पाण्याचा "सुकाळ' राहणार हा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा अंदाज साफ चुकला असून, उजनीची पाणीपातळी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच बुधवारी (ता. 11) 29 टक्‍क्‍यांवर आली आहे. ही घटणारी पाणीपातळी देशी-विदेशी पक्ष्यांना मात्र फायदेशीर ठरत आहे. पाणी कमी झाल्याने किटक, गोगलगाई व लहान-मोठे मासे, किडे, शंख-शिंपले, मोठ्या प्रमाणावर जलाशयाच्या कडेला येत असल्याने या पक्ष्यांना खाद्य मिळविणे सोपे जात आहे. यामुळे उजनीच्या पाणलोट पट्ट्यात जलाशयाजवळ सकाळ व सायंकाळी विविध जातींच्या, रंगांच्या, आकारांच्या देशी-विदेशी पक्ष्यांची मांदियाळी जमत आहे. 

Web Title: Bird on Ujani dam