'यासाठी' सोलापुरात झाली पक्ष्यांची शिकार!

'यासाठी' सोलापुरात झाली पक्ष्यांची शिकार!

सोलापूर : कुंभारी परिसरात माळरानावर पक्ष्यांची शिकार करणाऱ्या तिघांना नेचर कॉंझर्वेशन सर्कलच्या सदस्यांची पकडले. औषधासाठी पक्ष्यांची शिकार करणाऱ्या तिघा शिकाऱ्यांना वन विभागाने अटक केली आहे. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. 

11 पक्ष्यांची केली शिकार
माळरानावर तीन शिकारी वन्यजीवांची शिकार करण्यासाठी आल्याचे दिसून आले. त्यांच्या हातात फायरगण होती. तेथील शेतकऱ्यांनी लगेच नेचर कॉंझर्वेशन सर्कलच्या सदस्यांना फोन करून कळविले. शिवानंद हिरेमठ, सुशांत कुलकर्णी, बसवराज बिराजदार आणि संतोष धाकपाडे हे काही वेळातच त्या परिसरात पोचले. तीन शिकारी पैकी दोन शिकारी रस्त्याच्या कडेला थांबले होते. तिसरा शिकारी हातात छऱ्याची बंदूक घेऊन येत होता. त्या तिघा शिकाऱ्यांनी जवळपास 11 पक्ष्यांची शिकार केली होती. त्यामध्ये दोन पारवे, एक पखुरडी, पाच कंठी होला आणि आपल्याकडे स्थलांरीत पाहुणे म्हणून आलेल्या तीन लाल कंठी होला या पक्ष्यांचा समावेश आहे. बंदुकीच्या सहायाने पक्ष्यांची शिकार केल्याचे दिसून आले. 

हेही वाचा : चंपीने अजगराशी दिली अशी झुंज...

या घटनेची माहिती नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे प्रमुख भरत छेडा यांना तसेच वन विभागाचे अधिकारी बापू भोई यांना कळविली. काहीवेळातच वन विभागाचे पथक घटनास्थळी पोचले. त्या तिघा शिकाऱ्यांना नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी वन विभागाच्या ताब्यात दिले. यावेळी वन विभागाचे मुन्ना निरवणे आणि श्री. हिरोळे उपस्थित होते. 
 
औषधासाठी पक्ष्यांचा वापर.. 
नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी पकडलेले तीन शिकारी मिरज (जि. सांगली) या परिसरातील असल्याचे समोर आले आहे. शिकार केलेल्या पक्ष्यांचा औषध म्हणून वापर करत असल्याचे शिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com