सांगलीच्या कृष्णाकाठी किलबिल पाहुण्यापक्षांची 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

सांगली - संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावर मनुष्यवस्ती मोठ्या आनंदाने नांदतेय. या कृष्णाकाठचे लोकांना नेहमीच आकर्षण राहिलेय. आता त्यात पक्षीही मागे नाही बरं का ! हिवाळा सुरु झाला की देशभरातील पाहुणे पक्षी कृष्णाकाठी कूच करतात आणि इथल्या डोहांमध्ये आनंदाने हिवाळा व्यतीत करतात. सध्या शेकडो पाहुणे पक्षा इथे आले आहेत. त्यांची जलक्रीडा पाहण्यासाठी सांगलीकरांचीही गर्दी होतेय.

छायाचित्रकार, पक्षीप्रेमींसाठी तर ही एक पर्वणीच ठरते आहे. 
कृष्णा नदीकाठी उसाचे भरपूर पीक आहे. या पिकात असंख्य प्रकारचे कीट आहेत. नदीत माशांचा संख्या मोठी आहे. सांगलीत बंधाऱ्याच्या खाली पाणी कमी असते. त्यात किटक, छोटे मासे पक्षांना सहज भक्ष्य बनवता येतात. इथे तुलनेत थंडी कमी असते. त्यामुळे थंडीच्या प्रदेशातून कमी थंडीच्या प्रदेशात स्थलांतर करताना पक्षांना सांगलीचा कृष्णाकाठ ऊबदार वाटतोय. त्यात वेडा राघू, खंड्या, रंगीत करकोचा, टिटवी, कवड्या खंड्या, पानकावळा, राखी बगळा, चक्रवाक, चमचा, मोर शराटी, चिरक किंवा काळोखी, काळ्या मानेचा शराटी, तारवाली पाकोळी, जांभळी पानकोंबडी, शेकाट्या, मुनिया आदी पक्षांचा समावेश आहे. 

पक्षांचे फोटो फिचर पाहण्यासाठी क्लिक करा

कृष्णाकाठी किलबिल पाहुण्या पक्षांची...  

सध्या इथे चक्रवाघ पक्षांची संख्या अधिक दिसतेय. याला गोल्डन डकही म्हणतात. हा पक्षी पाकिस्तान, म्यानमार, चीनमध्येही आढळतो. तो स्थलांतर करत असतो. मोर शकाटी पक्षांची संख्याही लक्षवेधी आहे. हा पक्षी आशिया खंडातील बहुतांश देशांत आढळतो. उथळ पाण्यात दिवसभर चोच बुडवून भक्ष शोधणे या पक्षाला भारी आवडते. हा या पक्षाचा प्रजनन काळ असल्याने नदीकाठी घरटी करून त्यात हे पक्षी राहतात. 

सध्या रब्बी हंगामातील शाळूचे दाणे भरू लागले आहेत. हे दुधाळ दाणे खाण्यासाठी अनेक पक्षांचे थवे या कणसावर जमू लागले आहेत. दाण्यावर ताव मारताना काळा डोक्याचा मुनिया व टिपकेदार मनोली हा पक्षी विशेष करून पाहायला मिळत आहे. 

Web Title: Birds on Sangli Krishna River Bank