भाजप आघाडीचे 22 उमेदवार जाहीर 

bjp
bjp

कोल्हापूर - भारतीय जनता पक्ष, जनसुराज्य शक्ती, ताराराणी आघाडी व युवक क्रांती आघाडीची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची पहिल्या 22 उमेदवारांची यादी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. विद्यमान सदस्या शौमिका महाडिक यांच्यासह भाजपत प्रवेश केलेल्यांनाच उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत भाजपचे 15, जनसुराज्य शक्‍ती 5, युवक क्रांती दल व ताराराणी आघाडीच्या प्रत्येक एका उमेदवाराचा समावेश आहे. 

भाजपचे उमेदवार असे (कंसात तालुका व मतदारसंघ) ः शौमिका अमल महाडिक (शिरोली पुलाची, हातकणंगले), अरुण जयसिंगराव इंगवले (हातकणंगले), विजया बाळासाहेब पाटील (कबनूर), महावीर शंकर गाट (रेंदाळ), स्मिता वीरकुमार शेंडुरे (हुपरी), प्रसाद बाळकू खोबरे (कोरोची), विजय जयसिंग भोजे (अब्दुललाट शिरोळ), शुभांगी संभाजी आरडे (राधानगरी) संदीप धनंजय पवार (कौलव), देवराज मनवेल बारदेस्कर (आकुर्डे, भुदरगड), हेमंत तुकाराम कोलेकर (नेसरी, गडहिंग्लज), संजय सुरेश बटकडली (गिजवणे-कडगाव), कल्पना केरबा चौगुले (यवलूज, पन्हाळा), पांडुरंग गुंडू शिंदे (तिसंगी, गगनबावडा), शुभांगी अमर जत्राटे (शिंगणापूर, करवीर). 

जनसुराज्य शक्तीतर्फे जाहीर केलेले उमेदवार ः शिवाजी मोरे (सातवे, पन्हाळा), समृद्धी सचिन पाटील (पोर्ले तर्फ ठाणे), शंकर पाटील (कोतोली), डी. वाय. कदम (सरूड, शाहूवाडी), अमोल गावडे (कुंभोज, हातकणंगले). युवक क्रांतीचे उमेदवार असे ः स्मिता महेशकुमार नाझरे (पट्टणकोडोली, हातकणंगले), ताराराणी आघाडीचे उमेदवार म्हणून अशोक काशीनाथ चराटी (आजरा). 

जिल्हा परिषदेच्या 67 जागा आणि पंचायत समितीच्या 134 जागा भाजप, जनसुराज्य शक्ती, ताराराणी आघाडी व युवक क्रांती आघाडीने एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. घटक पक्ष व भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. 

पहिल्या यादीत तीन विद्यमान 
भाजप व अन्य घटक पक्ष व आघाडीच्या पहिल्या यादीत चार विद्यमान सदस्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये शौमिका महाडिक, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून प्रवेश केलेले अरुण इंगवले, विजया पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय जनसुराज्य आघाडीतून भाजपत प्रवेश केलेल्या गगनबावडा तालुक्‍यातील पी. जी. शिंदे, राष्ट्रवादीतून आलेले मनवेल बारदेस्कर यांनाही उमेदवारी दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com