भाजपच्या नेत्यांची मापे काढू नका - अनिल देसाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

म्हसवड - दुसऱ्याची पोरं सांभाळणाऱ्यांनी व दुसऱ्यांच्या पोरांचे बारसं घालणाऱ्यांनी भाजपच्या नेत्यांची मापे काढू नयेत, असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार गोरे यांना नाव न घेता येथे पत्रकार परिषदेत दिला.

म्हसवड - दुसऱ्याची पोरं सांभाळणाऱ्यांनी व दुसऱ्यांच्या पोरांचे बारसं घालणाऱ्यांनी भाजपच्या नेत्यांची मापे काढू नयेत, असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार गोरे यांना नाव न घेता येथे पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, शहर अध्यक्ष अरविंद पिसे, पिंटू जगदाळे, डॉ. उज्वल काळे उपस्थित होते. केवळ नावासाठी राजकारण करून जनतेची दिशाभूल करणे बंद करा. स्वतः आयत्या पोरांना खेळवायचं काम करा. भाजपच्या नादी लागू नका. तुम्ही आपले वजन पाहून सरकारवर आरोप करा, असा सल्ला देत ते म्हणाले, ‘‘घरांघरांत भांडणे लावून तुम्ही सत्ता मिळवलीत. आता तुमचे बघा. भाजपने माण तालुक्‍यास पाणी दिले आहे.

पाणीपूजन करण्याचा भाजपचा नैतिक अधिकार आहे. आमदार जयकुमार गोरे हे माणच्या जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी दुसऱ्याच्या बाळंतपणाचे दिवस मोजू नयेत. म्हसवडला पाणी देणार नाही, असे हेच आमदार म्हणत होते.

भाजपच्या नेत्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे म्हसवडला पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानुसार शासनाने म्हसवडला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता हेच आमदार म्हसवडला पाणी येणार असे सांगत सुटले आहेत. भाजप १६ गावांना पाच इंची नाही तर सहाशे मिलिमीटर व्यासाच्या पाइपमधून पाणी सोडणार आहे. आमदाराचे सगळे पाप धुवून जाईल इतके पाणी आम्ही सोडणार आहे. ’

पिंपरीच्या पाण्याचे श्रेय भाजपचेच आहे. यात आमदारांनी लुडबुड करू नये. रेटून खोटे बोलणाऱ्यांनी आपले काम काय, हे माणच्या जनतेस सांगावे. सगळा विकास मीच केला, असे सांगून दिशाभूल करणे हाच तुमचा विकास आहे.
- अनिल देसाई, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप

Web Title: BJP Anil Desai Politics Comment