छिंदमने आम्हाला मतदान का केले? यात भाजपचाच हात : शिवसेना 

BJP asked Shripad Chindam to vote for Shiv Sena, alleges party members
BJP asked Shripad Chindam to vote for Shiv Sena, alleges party members

नगर : भाजपचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांच्या सांगण्यावरूनच श्रीपाद छिंदमने शिवसेनेला मतदान केले, असा आरोप महापौरपदाचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनी आज (शुक्रवार) केला. नगर महानगरपालिकेमध्ये आज झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या साथीत विजय मिळविला. 

या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. महापौरपदासाठी शिवसेनेकडून बोराटे आणि उपमहापौरपदासाठी गणेश कवडे यांनी अर्ज भरला होता. पण दोन्ही पदांवर भाजपचेच उमेदवार निवडून आले. 

'छिंदमचे मत ग्राह्य धरले जाऊ नये', अशा आशयाचे पत्र शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी दिले होते; पण प्रशासनाने ते मान्य केले नाही. 

या निवडणुकीमध्ये छिंदमने शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे काही नगरसेवकांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घातला. 'एका खासदाराने आणि आमदारने सांगितल्यामुळे छिंदमने ही चाल खेळली', असा शिवसेनेचा आरोप आहे. 'छिंदमचे मत ग्राह्य धरले जाऊ नये', अशा आशयाचे पत्र शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी दिले होते; पण प्रशासनाने ते मान्य केले नाही. 

'आम्ही कधीही छिंदमकडे मत मागण्यासाठी गेलो नव्हतो. हे षडयंत्र आहे. सभा सुरू होण्यापूर्वीच आम्ही पीठासीन अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र दिले होते. हे सगळे पूर्वनियोजित कारस्थान आहे', अशी टीका बोराटे यांनी केली.

'खासदारांना त्यांचा मुलगा आणि सून निवडून आणता आली नाही. घरच्या उमेदवारांना निवडून न आणता आल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. यांनी काय काय केले आहे, हे संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे', अशा शब्दांत बोराटे यांनी टीका केली. 

'राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकच आहेत. हे आजच्या निवडणुकीतून पुन्हा दिसून आले. या दोघांनी युती करून शहराला फसविले आहे. आम्हाला बदनाम करण्यासाठी त्यांनी छिंदमला शिवसेनेला मतदान करायला लावले', असा शिवसेनेचा आरोप आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com