सांगलीत भाजपचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

सांगली - उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवल्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथे  विजयोत्सव साजरा केला. राम मंदिर चौकात ढोल-ताशांच्या गजरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. नागरिकांना साखर वाटली.

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज लागले. मतमोजणीत जसे भाजपच्या बाजून कौल लागू लागले तसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची गर्दी झाली. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत येणार हे  स्पष्ट झाल्यानंतर राम मंदिर चौकात ढोल आणि ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. नागरिकांना साखर वाटली. शेखर इनामदार, शरद नलवडे  आदी उपस्थित होते.

Web Title: bjp celebration by uttarpradesh win