सोलापुरात भाजप नगरसेवकांची खदखद 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 3 मे 2018

सुरेश पाटील यांची उणीव 
माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांची उणीव भाजपच्या बैठकीत जाणवू लागली आहे. एखाद्या प्रस्तावावर धोरण ठरविताना, अधिकाऱ्याने वेळ मारुन नेणारे उत्तर दिले किंवा चुकीच्या पद्धतीने सूचना केली तर, त्याबाबत  जागेवर जाब विचारण्याचे  सांगण्याचे धाडस त्यांच्यात होते. विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये ते दिसत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून केलेली "फिरवाफिरवी' त्यांच्या ध्यानात येत नाही. या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर श्री. पाटील यांची उणीव जाणवत असल्याचेही काही नगरसेवकांनी सांगितले.

सोलापूर : महापालिकेचे नगरसचिव प्रवीण दंतकाळे हे भाजपचे पक्षनेते झाले असून, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे हे विरोधी पक्षनेते आहेत, असे खळबळजनक वक्तव्य सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीनिवास करली यांनी केले आहे. 

नगरसचिव सांगतील तेच आमचे लोक ऐकतात.कोणतेही धोरण ठरविताना जेष्ठांकडून विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आरोपही श्री करली यांच्यासह भाजपच्या काही नगरसेवकानी  केला आहे. 

पक्षीय बैठकीत नगरसचिव सांगतील त्यानुसार विषय चर्चेला घेतले जातात. पक्षनेते खुर्चीवर असतात, पण त्यांच्यापेक्षा नगरसचिव हेच विषयावरील निर्णय काय घेतला पाहिजे हे सुचवितात. त्यामुळे नगरसचिव  हेच आमचे पक्षनेते झाले आहेत असा   विश्‍वास वाटू लागला आहे, अशा प्रतिक्रिया नाराज नगरसेवकांतून व्यक्त होऊ लागल्या आहेत. 

ज्येष्ठ नगरसेवक  आम्हाला विश्‍वासात घेत नाहीत. ते परस्पर धोरण ठरवतात. एखाद्या विषयावर आमचे मत मांडले तर  सुधारणा सुचविण्याऐवजी ते चुकीचे कसे आहे आणि ते म्हणतात तेच कसे योग्य आहे हे सांगण्याकडे त्यांचा आग्रह असतो. सर्वांचे म्हणणे एकूण सर्वानुमते धोरण ठरविणे अपेक्षित असताना तसे होताना दिसत नाही, अशी खदखदही या नगरसेवकांतून व्यक्त होऊ लागली आहे. ज्येष्ठ म्हणून  आदर आहे, पण त्याचा गैरफायदा घेतला जातो. या भूमिकेमुळेे पक्ष अडचणीतही येऊ शकतो, असा दावाही या नगरसेवकांतून केला जात आहे. 

सुरेश पाटील यांची उणीव 
माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांची उणीव भाजपच्या बैठकीत जाणवू लागली आहे. एखाद्या प्रस्तावावर धोरण ठरविताना, अधिकाऱ्याने वेळ मारुन नेणारे उत्तर दिले किंवा चुकीच्या पद्धतीने सूचना केली तर, त्याबाबत  जागेवर जाब विचारण्याचे  सांगण्याचे धाडस त्यांच्यात होते. विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये ते दिसत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून केलेली "फिरवाफिरवी' त्यांच्या ध्यानात येत नाही. या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर श्री. पाटील यांची उणीव जाणवत असल्याचेही काही नगरसेवकांनी सांगितले.

Web Title: BJP corporaters in Solapur Municipal Corporation