
केंद्राने आणलेले कृषी विषयक कायदे शेतकरी हिताचे आहेत. बाजारावर असलेले नियंत्रण थांबण्यास मदत होईल. शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचे धाडस भाजपने केले आहे, असे मत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे राज्यप्रमुख संजय कोले यांनी व्यक्त केले.
सांगली : केंद्राने आणलेले कृषी विषयक कायदे शेतकरी हिताचे आहेत. बाजारावर असलेले नियंत्रण थांबण्यास मदत होईल. शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचे धाडस भाजपने केले आहे, असे मत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे राज्यप्रमुख संजय कोले यांनी व्यक्त केले.
शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेमार्फत आज (ता. 10) लो. टिळक स्मारक मंदिर येथे "केंद्र सरकार कृषी कायदा' वर चर्चासत्र झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होते.
श्री. कोले म्हणाले,""शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडू लागली आहे. आत्महत्याही वाढू लागल्यात. शेतमालाचा भावदेखील जाणून-बुजून पाडला जात आहे. आमचा विकास करायला आम्ही तयार आहोत. प्रजेची आर्थिक उन्नती करणारे सरकार असायला पाहिजे. राज्यातील सरकार प्रजेची आर्थिक उन्नती करणारे नाही. केंद्राने तीन कृषी कायदे केलेत. त्याला विरोधासाठी कॉंग्रेस रस्त्यावर उतरली आहे. शेतकरी संघटनेच्या काही नेत्यांचाही विरोध आहे. आम्ही त्यांचा डाव मोडून काढू.''
श्री. शिंदे म्हणाले,""कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. हे विधेयक पास झाले, त्या दिवसापासून विरोध होऊ लागलाय.नव्या कायद्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळेल. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.''
शीतल राजोबा यांनी प्रस्ताविक केले. बाळासो चव्हाण, मनोहर सणस, लक्ष्मण रांजणे, आबासाहेब ताकवणे, अशोक पोवार, निंगू बिरादार, नवनाथ पोळ, शीतल राजोबा, अल्लाउद्दीन जमादार, राम कणसे, अशोक पाटील, सुभाष मद्वाण्णा, गुंडा माळी, बाशेखान मुजावर उपस्थित होते.
संपादन : प्रफुल्ल सुतार