भाजपचा महापौरपदाचा उमेदवार 3 मार्चनंतर ठरणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

सोलापूर महापालिकेत पहिल्यांदाच 49 जागा जिंकून भाजपने इतिहास घडविला आहे. महापौरपदाची निवड 8 मार्च रोजी होत आहे.

सोलापूर : महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार तीन मार्चनंतर निश्‍चित करण्यात येईल, असे पालकमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले. कॉपी विथ्‌ सकाळ उपक्रमांतर्गत ते "सकाळ' कार्यालयात बोलत होते.

महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 49 जागा जिंकून भाजपने इतिहास घडविला आहे. महापौर पदाची निवड 8 मार्च रोजी होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर विचारले असता देशमुख म्हणाले, "उद्या (बुधवार) आणि परवा (गुरुवार) पुणे व मुंबईत भाजप नेत्यांच्या मुलांची लग्ने आहेत. त्यामुळे या दिवसात बैठक अपेक्षित नाही. मुंबईत गेल्यावर माझ्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची एकत्रित चर्चा होईल व त्यानंतर महापौरपदाचा उमेदवार निश्‍चित केला जाईल.''

महापौर निवडणुकीत भाजपचाच उमेदवार निवडून येईल यासाठी आवश्‍यक असलेल्या व्यूहरचना केली असून, एका पक्षाचे उमेदवार त्यादिवशी गैरहजर राहतील, असा दावाही पालकमंत्र्यांनी यावेळी केला.

 

Web Title: bjp to decide mayor candidate after 3 march