भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : अविनाश महागावकर

राजकुमार शहा 
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

मोहोळ : भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, भिमा कारखान्याला मदत करण्यापाठीमागची भुमिका केवळ शेतकरी हित जपणे हीच आहे. असे प्रतिपादन शिखर बँकेचे संचालक तथा लोकमंगल परिवाराचे सदस्य अविनाश महागावकर यांनी केले.

मोहोळ : भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, भिमा कारखान्याला मदत करण्यापाठीमागची भुमिका केवळ शेतकरी हित जपणे हीच आहे. असे प्रतिपादन शिखर बँकेचे संचालक तथा लोकमंगल परिवाराचे सदस्य अविनाश महागावकर यांनी केले.

टाकळी सिकंदर (ता.मोहोळ) येथील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या 39 व्या गळीत हंगाम शुभारंभ अविनाश महागावकर व हभप जयवंत बोधले महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक होते. यावेळी व्यासपिठावर श्रीधर बिरजे, बबन महाडिक, नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष पाटील, शंकर वाघमारे, समता गावडे, साधना देशमुख, भारत पाटील, माणिक बाबर, राजु बाबर, झाकीर मुलाणी, सर्व संचालक उपाध्यक्ष सतिश जगताप, कार्यकारी संचालक अशोक पाटील, बाबा जाधव, ज्ञानेश्वर जाधव, अंकुश अवताडे, संग्राम चव्हाण, धोंडीबा उन्हाळे, माणिक पाटील आदी उपस्थीत होते.

महागावकर पुढे म्हणाले, या शासनाने कारखाना व शेतकऱ्यांच्या हिताचे मोठे निर्णय घेतले आहेत. त्यात साखरेचा नक्की भाव कच्ची साखर निर्यात आधीचां समावेश आहे. पुढील काळात साखर कारखानदारीला या निर्णयामुळे अच्छे दिन येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी व सहकार मंत्र्यानी साखर कारखाने टिकावेत या अनुषंगाने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. यापुर्वी जी मदत झाली ती केवळ मलमपट्टी केली गेली.

खासदार महाडिक म्हणाले, अतिरिक्त उसाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी विस्तारीकरण करणे गरजेचे होते, ते आता झाले आहे. कुठलाही उपपदार्थ नसताना इतराबरोबर दिलेला दर व तंतोतंत ऊसाचा काटा या कारखान्याच्या जमेच्या बाजु आहेत. भविष्यात कारखाना कच्ची साखर निर्यात करणार आहे व इथेनॉल निर्मीती प्रकल्प उभारणार आहे. बोधले महाराज यांनी अध्यात्मातील कांही उदाहरणे सांगुन, कारखान्याच्या प्रगतीला सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सुत्रसंचलन पांडुरंग ताटे यांनी केले तर सतीश जगताप यांनी आभार मानले.
 

Web Title: BJP government backing farmers Avinash Mahagaonkar