सरकार शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय निष्ठूर- अजित पवार

ajit-pawar
ajit-pawar

मोहोळ - देशासह राज्यातील भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय निष्ठूर असुन, फसव्या घोषणा करून सर्व आघाड्यावर निष्क्रीय ठरलेल्या या भाजपा सरकारला हा जनसमुदाय येणाऱ्या निवडणुकीत घरी बसविल्याशिवाय गप्प बसणार नाही असे प्रतिपादन मोहोळ येथील हल्लाबोल यात्रेच्या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. राज्य व केंद्र सरकारच्या अकार्यक्षम कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्यातील ६५ व्या सभेत अजित पवार मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या भव्य सभेत बोलत होते. 

यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले, नोटांबंदीच्या आगोदर रिजर्व्ह बँकेला ६८ हजार कोटींचा नफा होत होता. नोटांबंदीच्या नंतर तो नफा सत्तर हजार कोटी रुपये होणे अपेक्षित होता मात्र तो तीस हजार कोटी रुपये इतका खाली घसरला आहे. नव्या नोटा छापायला लागलेले सोळा हजार कोटी आणि रिजर्व बँकेचा झालेला चाळीस हजार कोटी रुपयांचा तोटा असे मिळून भाजप सरकारने देशाचा तब्बल ५६ हजार कोटी रुपयांचा तोटा केला. यावेळी अंजिक्यराणा व विक्रांत पाटील यांच्या नेटक्या नियोजनाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर या हल्लाबोल यात्रेचे मुख्य आयोजक माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार हनुमंत डोळस, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व लोकनेते शुगरचे चेअरमन विक्रांत पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अंजिक्यराणा पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे, म्हाडाचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, प्रदेश सरचिटणीस उमेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत माने, महिला जिल्हाध्यक्षा मंदा काळे, मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर, माळशिरसच्या सभापती वैष्णविदेवी मोहिते पाटील, माजी सभापती राजूबापू पाटील आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना सुनील तटकरे म्हणाले शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला. शेतकऱ्याशी नाळ जोडलेल्या नेतृत्वाने देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर देशभरातील शेतकऱ्याना कसल्याही प्रकारचे अर्ज न मागविता सरसकट एकाहत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. 

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले, 'अच्छे दिन' हा आता चेष्टेचा विषय झाला असून, सर्वसामान्यांबरोबरच केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्री देखील आता याविषयाची चेष्टा करीत आहेत.

प्रास्ताविक करताना माजी आमदार राजन पाटील म्हणाले, तालुक्यात सगळेच विरोधी पक्ष एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करतात मात्र तालुक्यातील जनतेने नेहमीच शरद पवारांच्या विचारांची पाठराखण केली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोहोळ तालुक्याचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल आणि अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या अर्जावर त्यांची अनुमोदन म्हणून सही असेल.

या कार्यक्रमाला माजी उपसभापती मानाजी माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, नागेश साठे, हेमंत गरड, शशिकांत पाटील, दीपक माळी, विजय कोकाटे, समाधान कारंडे, राजकुमार पाटील(देगाव) छोटू देशमुख, ज्ञानेश्वर चव्हाण, शुक्राचार्य हावळे, सज्जन पाटील, शौकतभाई तलफदार, प्रमोद डोके, संतोष सुरवसे, आण्णा फडतरे, सुरेश कांबळे, मुश्ताक शेख, महेश पवार, अविनाश मार्तंडे, जितेंद्र साठे, पप्पू ताकमोगे, एजाज तलफदार,कामिनी चोरमले, सिंधु वाघमारे, प्रशांत बचुटे, मुकेश बचुटे, धनाजी गावडे, रामचंद्र खांडेकर, प्रशांत पाटील, काका पवार, राहुल मोरे,संतोष खंदारे, दत्ता खवळे, हणमंत पोटरे, चंद्रहार चव्हाण, रविद्र देशमुख, रामराजे कदम, आदीसह सुमारे १५ ते २० हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com