कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

कोल्हापूर - भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा पक्षाने तडकाफडकी राजीनामा घेतला. शासकीय विश्रामगृहावर त्यांना बोलवून पक्षाने त्यांना दिलेले वाहनही काढून घेतले. देसाई यांचा अचानक राजीनामा घेतल्याने भाजप वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

कोल्हापूर - भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा पक्षाने तडकाफडकी राजीनामा घेतला. शासकीय विश्रामगृहावर त्यांना बोलवून पक्षाने त्यांना दिलेले वाहनही काढून घेतले. देसाई यांचा अचानक राजीनामा घेतल्याने भाजप वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा का घेतला? याची कारणे एक-दोन दिवसांत उघड होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, देसाई यांची मुदत संपल्यानेच त्यांचा राजीनामा घेतल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून संदीप देसाई काही दिवसांपासून काम पाहात होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळातच महापालिका निवडणुका, लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. आज पक्षाचे महेश जाधव, उपाध्यक्ष अशोक देसाई, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक राहुल चिकोडे यांनी देसाई यांना शासकीय विश्रामगृहावर बोलवून घेतले आणि त्यांच्याकडील वाहन काढून घेतले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरून राजीनामा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरून कारवाई केली. देसाई यांचा कार्यकाल संपला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा दिला असून, त्यांचा राजीनामाही मंजूर केला आहे. त्यानंतरच पक्षाने देसाई यांना दिलेल्या सर्व सुविधा काढून घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर ही कारवाई केली आहे. आता रिक्त झालेल्या पदाचा तात्पुरता पदभार कोणाकडे द्यायचा, याबाबत पालकमंत्री पाटील यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल.
- महेश जाधव,
अध्यक्ष पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Kolhapur District President resigns