भाजपाचे नेते बिनकामाचे तर मंत्री कठपुतली - काँग्रेस नेत्या

संजय आ. काटे 
मंगळवार, 17 जुलै 2018

श्रीगोंदे (नगर) : काँग्रेसने देशात लोकशाही जिवंत ठेवली, मात्र आता भाजप सरकार हुकूमशाही आणण्याच्या प्रयत्नात आहे. देशात एकाधिकारशाही आली असून, सत्ताधारी पक्षाचे नेते बिनकामाचे तर मंत्री कठपुतली झाल्याचा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसच्या महिला आघाडी सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी केला. 

सरकारच्या निषेधार्थ काष्टी येथील नगर-दौड रस्त्यावर विविध प्रश्नी आज काँग्रेसने आंदोलन केले. त्यावेळी नागवडे म्हणाल्या, मोदी व फडणवीस सरकार सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळत आहे. लोक या सरकारला वैतागले असून निवडणुकीची वाट पाहत आहेत.  पुढच्या वर्षी हे सरकार दिसणार नाही मात्र तेच पुन्हा सत्तेत आले तर लोकांना रस्त्यावर फिरणेही मुश्किल होईल याची जाणीव सगळ्यांनीच ठेवावी.

राज्यात दूध दरवाढीचे आंदोलन मोडीत काढण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून नागवडे म्हणाल्या, दुग्धविकास मंत्री शेतकऱ्यांना गाठ माझ्याशी असल्याचा दम देतात.  ते विसरले की त्यांचीच गाठ काही दिवसात सामान्यांशी पडणार आहे . शेतकऱ्यांच्या मालाला दर मित नसताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. हे सरकार आंधळे व बहिरे बनले आहे. तालुक्यातील रस्ते, पाणी, प्रकल्प दुरुस्ती आदी विषयात नागवडे यांनी अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी प्रश्न विचारून हतबल केले.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, अरुण पाचपुते, प्रा. सुनील माने, सुभाष शिंदे, अनिल पाचपुते, विलास काकडे,  चांगदेव पाचपुते, कृष्णाबाई पाचपुते, सुरेखा लकडे, सुरेश घोलप आदी उपस्थितीत होते.

Web Title: BJP leader and minister are puppets-Congress leader