भाजप नेते लहामटे, भांगरे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल

अल्ताफ शेख
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

अकोले (नगर) : भारतीय जनता पार्टीचे अकोले तालुक्‍यातील जिल्हा परिषद डॉ. किरण लहामटे, भाजप नेत्या सुनिता भांगरे व युवानेते अमित भांगरे यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे येथील नेते मधुकर पिचड यांनी अलिकडेच भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाली होती. तथापि, आता भाजपमधील या नेत्यांनी कमळ सोडून घड्याळची साथ करण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा चुरस निर्माण झाली आहे. अकोले येथील बाजारतळावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार याच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यास प्रारंभ झाला. त्या वेळी रॅलीने दाखल होत या नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगर जिल्ह्याचे निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदिप वर्पे, ज्येष्ठ नेते घन:श्‍याम शेलार, राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, दशरथ सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पवार याचे सकाळी दहा वाजता कळस येथे स्वागत करण्यात आले. तेथून ते मोटारसायकल रॅलीने अकोले शहरात दाखल झाले. महात्मा फुले चौकातून ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुकीने ते सभास्थळी पोचले.
---

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Lahamate, Bhangra filed in NCP