राज ठाकरे यांच्याविरुद्ध भाजपच्या नेत्या पोलिसांत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

सांगली : मुंबईत शिवतीर्थावरील मनसेच्या सभेत राज ठाकरे यांनी जातीय दंगलींबाबत केलेले वक्तव्य जातीय तेढ निर्माण करणारे आहे. राम मंदीराच्या मुद्यांवर हिंदू-मुस्लीम दंगली होणार याची राज यांना खात्रीच असेल तर त्यांनी ती माहिती सरकारला द्यावी, असे आव्हान देत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर (सांगली) यांनी राज यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. 

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा असलेल्या नीता केळकर यांनी सोमवारी दुपारी भाजप कार्यकर्त्यांसह सांगली शहरातील संजयनगर पोलिस ठाण्यात जाऊन राज ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला. त्यात त्यांनी राज ठाकरे यांचे कालचे भाषण घरात टीव्हीवर पाहिल्याचे म्हटले आहे. या भाषणात राज यांनी समाजमन भडकावणारे मुद्दे मांडले, त्यात राम मंदीरच्या मुद्यांवर आणि निवडणुकांच्या तोंडावर दंगली होतील, असा ठाम दावाच त्यांनी केला आहे.

त्यांना काही लोक येऊन भेटल्याचे ते म्हणाले. त्यांच्याकडे तशी माहिती असेल तर त्यांनी ती न लपवता सरकारला द्यायला हवी, असे आव्हान केळकर यांनी दिले आहे. त्याविषयीची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. केळकर या संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याने त्यांनी तेथे अर्ज दिला असून पोलिसांनी त्यावर कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करून असे स्पष्ट केले आहे. केळकर या सांगली भाजपच्या निष्ठावान व धडाडीच्या नेत्या आहेत.

Web Title: BJP leader in police against Raj Thackeray