राष्ट्रवादीतील भाजपावासीयही पवारांच्या स्वागताला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

स्वागत, अभिनंदनासाठी झुंबड; जांभळे, माने व कुपेकर गटाचीही हजेरी

कोल्हापूर- नगरपालिका निवडणुकीनंतर व जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेले मातब्बरही आज माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वागतासाठी हजर होते. यात माजी खासदार श्रीमती निवेदीता माने, माजी आमदार अशोक जांभळे यांच्यासह आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता.

विविध कार्यक्रमाच्यानिमित्ताने दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या श्री. पवार यांचे दुपारी ताराराणी चौकातील हॉटेलमध्ये आगमन झाले. भारत सरकारने दोन दिवसापुर्वीच श्री. पवार यांना "पद्यविभूषण' पुरस्कार देऊन गौरव केल्यानंतर ते पहिल्यांदाच कोल्हापुरात आले होते. त्यांच्या स्वागत व अभिनंदन करण्यासाठी हॉटेलवर झुंबड उडाली होती. महापौर हसीना फरास, जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडीक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदिंनी त्यांचे स्वागत केले.

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर इचलकरंजी नगरपालिकेत सात जागा जिंकल्यानंतर सत्तास्थापनेवेळी भाजपाशी संधान साधलेले माजी आमदार अशोक जांभळे, जिल्हा परिषद निवडणुकीत दोन जागांसाठी भाजपासोबत गेलेल्या माजी खासदार श्रीमती निवेदीता माने, त्यांचे पुत्र धैर्यशील, अशाच दोन जागांसाठी चंदगड तालुक्‍यात गोपाळराव पाटील व भाजपासोबत हातमिळवणी केलेल्या आमदार संध्यादेवी कुपेकर, त्यांच्या कन्या सौ. नंदीती बाभुळकर आदी श्री. पवार यांच्या स्वागातासाठी उपस्थित होते. या सर्वांना पाहून उपस्थित कार्यकर्तेही अवाक्‌ झाले.

Web Title: bjp leader welcome Sharad Pawar in kolhapur