भाजप महामेळाव्यास उपस्थित राहण्याचे सहकार मंत्र्यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

येत्या विधान व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर मंत्री देशमुख भाजपाच्या चलो बुथ की ओर या कार्यक्रमासाठी मोहोळ येथे आले होते. त्यावेळी ते कार्यकर्त्याशी संवाद साधत होते. यावेळी तालुका अध्यक्ष सतीश काळे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहोळ - सहा एप्रिल रोजी मुंबई येथे होणाऱ्या भाजपाच्या महामेळाव्यास तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. येत्या विधान व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मंत्री देशमुख भाजपाच्या चलो बुथ की ओर या कार्यक्रमासाठी मोहोळ येथे आले होते. त्यावेळी ते कार्यकर्त्याशी संवाद साधत होते. यावेळी तालुका अध्यक्ष सतीश काळे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशमुख यांनी यशवंतनगर कळसे नगर आदी भागातील मतदान केंद्राना भेटी दिल्या व शासनाच्या विविध योजनांची पत्रके वाटली मतदान केंद्र प्रमुखाला माहिती देण्यात आली. भाजपा कार्यालयात तालुका अध्यक्ष सतीश काळे यांनी देशमुख यांचा सत्कार केला. त्या ठिकाणी मंत्री देशमुख यांनी कार्यकर्त्याच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या तसेच कर्जमाफी योजनेपासून कोण शेतकरी वंचित आहे काय याची चौकशी केली. गेल्या पावसाळ्यात वाळुज देगाव येथील बंधारा वाहुन गेला आहे. त्याच्या दुरुस्तीबाबत पाटबंधारे अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. 

दरम्यान सहा एप्रिलच्या महामेळाव्यास मोहोळ तालुक्यातून सुमारे तीन हजार कार्यकर्ते जाणार असून शहर व तालुक्यातून शंभर चारचाकी वाहने जाणार असुन रेल्वेने जाणाऱ्यासाठी मोहोळ रेल्वे स्थानकावर दोन रेल्वे गाडयांना थांबा दिला असल्याचे काळे यांनी सांगितले. याबाबत गावोगावी प्रबोधन करण्यात येत असल्याचेही काळे यांनी सांगीतले.

Web Title: BJP minister subhash deshmukh asks party workers represent at mumbai meeting