भाजपचा कार्यक्रम पैसे आडवा, विरोधकांची जिरवा- राणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

जनतेवर सर्जिकल स्ट्राइक
राणे म्हणाले, 'सर्जिकल स्ट्राइक हे शत्रू, अतिरेक्‍यांवर करतात. मात्र काळ्या पैशासाठी सर्जिकल स्ट्राइक केल्याचे पंतप्रधान म्हणतात, ते जनतेला उद्‌ध्वस्त करणार का? बनावट नोटा बाहेर काढण्यासाठी केलेल्या या सर्जिकल स्ट्राइकमध्ये सामान्य जनतेला त्रास झाला. आज अन्नधान्य घेण्यासाठी लोकांकडे पैसे नाहीत.'' राज्य सरकार भ्रष्टाचार बाहेर काढण्याची चर्चा करते, मात्र सरकारमध्येच 14 भ्रष्ट मंत्री आहेत. मग भ्रष्टाचार कसा रोखणार? असा सवाल त्यांनी मोदींना उद्देशून केला. 
 
सांगली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना वसंतदादा पाटील यांनी शेतीसाठी 'पाणी आडवा - पाणी जिरवा' असा कार्यक्रम राबवला होता. मात्र भाजप सरकारचा 'पैसे आडवा - विरोधकांची जिरवा', असा कार्यक्रम सुरू आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व आज राज्याला हवे, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांनी आज केले.
वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त सांगलीत आयोजित कार्यक्रमासाठी नारायण राणे आले होते. ते म्हणाले, 'दादांनी कॉंग्रेससाठी मोठे योगदान दिले. पक्ष वाढवला आणि सत्तेपर्यंत नेला. याची पुनरावृत्ती व्हावी, ही अपेक्षा आहे. त्यांनी तालुका सरचिटणीस पदापासून राष्ट्रीय सरचिटणीस पदापर्यंत मुख्यमंत्री, राज्यपाल ही पदे भूषवली. त्यांच्या माध्यमातून राज्यात सहकार, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात विकासाचे कार्य केले. ते विधायक पुरुष होते.''
राणे म्हणाले, 'दादांनी शेतीच्या विकासासाठी ताकारी, म्हैसाळसारख्या सिंचन योजना सुरू केल्या. तसेच सहकारी, शैक्षणिक चळवळीसाठी संस्था काढण्यास प्रोत्साहन दिले. आजही या योजना, संस्था दादांच्या नावाने ओळखल्या जातात. त्यांनी विदर्भ, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी दांडेकरांची सत्यशोधक समिती नेमली. राज्याच्या सर्व विभागांचा समान विकास व्हावा, असा त्यांचा प्रयत्न होता.''

जनतेवर सर्जिकल स्ट्राइक
राणे म्हणाले, 'सर्जिकल स्ट्राइक हे शत्रू, अतिरेक्‍यांवर करतात. मात्र काळ्या पैशासाठी सर्जिकल स्ट्राइक केल्याचे पंतप्रधान म्हणतात, ते जनतेला उद्‌ध्वस्त करणार का? बनावट नोटा बाहेर काढण्यासाठी केलेल्या या सर्जिकल स्ट्राइकमध्ये सामान्य जनतेला त्रास झाला. आज अन्नधान्य घेण्यासाठी लोकांकडे पैसे नाहीत.'' राज्य सरकार भ्रष्टाचार बाहेर काढण्याची चर्चा करते, मात्र सरकारमध्येच 14 भ्रष्ट मंत्री आहेत. मग भ्रष्टाचार कसा रोखणार? असा सवाल त्यांनी मोदींना उद्देशून केला. 
 
Web Title: bjp obstructing money against opposition- narayan rane