अमित शहा  24 जानेवारीला सांगली दौऱ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

सांगली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा सांगली व तासगाव शहरांचा दौरा निश्‍चित झाला आहे. ते 24 जानेवारी रोजी दौऱ्यावर येणार असून संपूर्ण दिवस विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील. सांगलीसह तासगावमध्ये त्यांच्या हस्ते काही कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन सुरु आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी याबाबतची माहिती दिली. 

श्री. शहा हे पहिल्यांदाच सांगलीला येत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याची जंगी तयारी भाजप करणार आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी हा दौरा महत्वाचा असणार आहे. श्री. शहा सकाळी येथील श्री गणपती मंदीरात दर्शन घेतली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

भाजप जिल्हा कार्यालयासाठी विजयनगर येथील नव्या न्यायालय इमारतीच्या पाठीमागील बाजूस अडीच एकर जागा खरेदी करण्यात आली आहे. त्याचे भूमीपूजन श्री. शहा यांच्या हस्ते करण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा मानस आहे. दुसऱ्या सत्रात तासगाव येथे खासदार संजय पाटील यांच्या नियोजनानुसार काही कार्यक्रम होणार आहेत. त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अनावरण होणार आहे. रात्री ते कोल्हापूरला मुक्कामी असतील, असे सांगण्यात आले. 

"आमच्यासाठी हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. 24 जानेवारीची वेळ मिळाली आहे, आता प्रमुख बैठका घेऊन त्याचे वेळापत्रक ठरवले जाईल.'' 

- सुधीर गाडगीळ, आमदार

उड्डाणपुलासाठी उद्‌घाटनाचा प्रयत्न 

विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाणपुलाचे उद्‌घाटन अमित शहा यांच्याच हस्ते करता यावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, मात्र या दौऱ्याआधी ते पूर्ण होऊ शकते, अशी स्थिती आहे. किमान या पुलावरून वाहतूक सुरु करता येईल, इतकी व्यवस्था शक्‍य होईल का, असा विचार केला जात आहे. आमदार सुधीर गाडगीळ त्यासाठी आग्रही आहेत. 

Web Title: BJP Party president Amit Shah on Sangli tour on 24 January