"सीएए'विरोधी नगरसेवकांचा भाजपतर्फे निषेध 

"सीएए'विरोधी नगरसेवकांचा भाजपतर्फे निषेध 

श्रीरामपूर : सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास (सीएए) विरोध करणाऱ्या नगरसेवकांचा भाजपतर्फे निषेध करण्यात आला. विरोध करणाऱ्यांना आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत "सीएए'ला विरोध दर्शविणारा ठराव मांडण्यात आला. त्यात कायद्याच्या विरोधात 19 नगरसेवकांनी मत मांडले. या प्रकाराचा भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निषेध केला आहे. लोकसभा व राज्यसभेत विशेष बहुमताने हा कायदा संमत झाला आहे. त्यास विरोध करणाऱ्या नगरसेवकांचे नेते लोकसभेत आहेत. त्यांनी समाजहित लक्षात घेऊन हा कायदा संमत केला.

कोणत्याही परिस्थितीत हा कायदा मागे घेतला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. 
भारतीयांचे नागरिकत्व हा कायदा हिरावून घेत नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातील अत्याचारित हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारशी आणि ख्रिश्‍चन यांना भारतीयत्व देण्यासाठी हा कायदा आहे. त्याविरोधात देशभर आंदोलने, निदर्शने केली जात आहेत. स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी, मुस्लिम समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी ही राजकीय खेळी खेळली जात आहे.

जनतेत अपूर्ण माहिती पसरवून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे पत्रकात म्हटले आहे. 
सामान्य श्रीरामपूरकर नगरसेवकांनी मांडलेल्या ठरावासोबत नाहीत. भाजपतर्फे "सीएए'च्या समर्थनार्थ जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचे समर्थन करणाऱ्या नागरिकांतर्फे पंतप्रधान कार्यालयास पोस्ट कार्ड पाठविणार असल्याचे तालुकाध्यक्ष सुनील वाणी यांनी सांगितले.

पत्रकावर जिल्हा कार्यकारिणी सदस्य गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल यादव, शहर संघटन सरचिटणीस अक्षय वर्पे आदींची नावे आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com