राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा भाजपतर्फे निषेध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

सांगली- कोरोना महामारीविरुध्दच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. राज्य सरकारने अजूनही या भयंकर साथीने पिचलेल्या जनतेसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केलेले नाही. राज्य सरकारचा नाकर्तेपणा आणि त्यांच्या नेतृत्वाचे दुर्लक्ष याच्या निषेधार्थ आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर आज महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. 

भाजपच्या वतीने आज राज्यात राज्य सरकारच्या निषेधार्थ " मेरा आंगण मेरा रणांगण' आंदोलन केले. काळ्या फिती, काळे मास्क लावून सोशल डिस्टन्स पाळत हे आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनाचा भाग म्हणून सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर सांगली भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, भाजयुमोचे अध्यक्ष दीपक माने सहभागी झाले होते. काळे मास्क लावून हातात सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन आंदोलन करण्यात आले. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यात तसेच केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचना, उपाययोजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. केंद्रातून मिळणाऱ्या मदतीचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरले आहे. कोविड वर प्रभावी उपाययोजना आणि प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना यामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. अशा गंभीर परिस्थितीतही राज्य सरकार केवळ दिखावूपणा करत आहे, अशा शब्दात आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. 
पक्षाच्या निर्देशानुसार भाजपाचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात निषेध व्यक्त केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP protests the state government's denial