भाजप 2019 ला विरोधी बाकावर बसलेला दिसेल - खासदार शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

कराड - केंद्र व राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या विऱोधातील आहे. मी कमळ औषधालाही ठेवणार नाही असे मी जाहीर केले होते. त्याला शेतकऱ्यांची साथ मिळत आहे. 2019 नंतर भाजप हा विरोधी बाकावर अतिशय छोट्या गटात बसलेला दिसेल, अशी टिका खासदार राजु शेट्टी यांनी आज कालच्या मोदि सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या प्रश्नावर केली. 

दुध आंदोलनानंतर पहिल्यांदाच ते कऱ्हाड (जि.सातारा) येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दुध विक्री करायची नाही हा निर्धार घेवुन दुध घरातच ठेवले. सरकारने, दुध संस्थांनी जंगजंग पछाडले तरीही त्यांना दुध दिले नाही. त्याचा परिणाम राज्यातील दररोज 1 कोटी 40 लाख लिटर दुध संकलनापैकी 1 कोटी 20 लाख एवढे संकलन झाले नाही. त्यामुळे मोठ्या शहरात तिसऱ्या दिवसापासुनच दुधाची टंचाई जाणवु लागली. शेतकऱ्यांनीही दुध आंदोलन आपल्या हातात घेतले. हा लोकसहभाग बघितल्यावर राजकीय पक्ष, संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. काहींनी दुध रस्त्यावर ओतुन राजु शेट्टींनी काय साध्य केले अशी माझ्यावर टीका झाली. मात्र शेतकऱ्यांनी जसे रस्त्यावर दुध टाकले तसे गोरगरिबांना, विद्यार्थ्यांना वाटले आहे. 1 कोटी 35 लाख लिटर दुध हे शेतकऱ्यांनी चांगल्या कामासाठी वापरले आहे. हेही लक्षात घ्या. भ्रष्ट झालेल्या पैशाला शेतकऱ्यांनी दुधाची आंघोळ घालुन पवित्र केले आहे. त्यामुळे दुध आॆदोलनाचे यश हे एेतिहासिकच आहे  (व्हीडीओ - हेमंत पवार)

Web Title: BJP Raju Shetty Politics Milk agitation